'..यासाठी केली मोदींच्या वेबसिरीजची निर्मिती', विरोधकांच्या आरोपांवर दिग्दर्शक उमेश यांचं प्रत्युत्तर

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 27 November 2020

मोदी आणि भाजपाचा प्रचार करण्यासाठी या सीरिजची निर्मिती केली गेली असा आरोप निर्मात्यांवर केला जातोय मात्र विरोधकांच्या या आरोपांवर दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी प्रत्युत्तर दिलंय. 

मुंबई- ‘मोदी: जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’ या वेब सीरिजचा दुसरा सीझन नुकताच रिलीज झाला. ही सीरिज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यामुळे देशभरातील काही प्रेक्षकांनी या सीरिजवर टीका देखील केली आहे. मोदी आणि भाजपाचा प्रचार करण्यासाठी या सीरिजची निर्मिती केली गेली असा आरोप निर्मात्यांवर केला जातोय मात्र विरोधकांच्या या आरोपांवर दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी प्रत्युत्तर दिलंय. 

हे ही वाचा: अभिनेत्री माधवी गोगटेंची पहिल्यांदाच मराठी मालिकेत एंट्री

‘मोदी: जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’ या वेब सीरिजचा दुसरा सीझन १२ नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. ही सीरिज लेखक किशोर मकवाना यांच्या ‘कॉमन मॅन – पीएम नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर आधारित आहे.दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी या पुस्तकाचे हक्क खरेदी करुन यावर या वेबसीरिजची निर्मिती केली आहे.

Working on Modi Season 2 – CM to PM changed me as a person: Umesh Shukla |  Entertainment News,The Indian Express

विरोधकांच्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी उमेश शुक्ला यांनी टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत स्लतःचं मत मांडल. ते म्हणाले, “नरेंद्र मोदी हे एक अद्भुत व्यक्तिमत्व आहे. त्यांची महत्वाकांक्षा पाहून आश्चर्य वाटतं. मोदींचं निःस्वार्थ काम संपूर्ण जगाला कळावं, यासाठी आम्ही या सीरिजची निर्मिती केली. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या वेगवेगळ्या घडामोडी आम्ही अगदी तटस्थपणे मांडत शूटींग केलं आहे. काही जणांना असं वाटतंय की आम्ही पंतप्रधानांचा प्रचार करण्यासाठी या सीरिजची निर्मिती केली पण हे खोटं आहे. एका गरीब घरात जन्मलेला मुलगा आज देशाचं प्रतिनिधित्व करतोय ही कल्पनाच मुळात प्रेरणादायी आहे आणि याच प्रेरणेतून आम्ही या सिरीजची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.”

या वेबसिरीजविषयी अनेक जणांची वेगवेगळी मतं असल्याने याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतोय.

director umesh shukla has opened up about directing modi the journey of a common man 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: director umesh shukla has opened up about directing modi the journey of a common man