
'करण जोहरच्या चित्रपटात काम सुरु करा', विवेक अग्नीहोत्रीचा प्रियंका गांधींना फुकटचा सल्ला! Vivek Agnihotri
'द काश्मीर फाइल्स' सारखा सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा वेगळा परिचय देण्याची गरज नाही. त्यांचे नाव नेहमीच चर्चेचा विषय असते.
ते नेहमी त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येतात. काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. तेव्हापासून काँग्रेसमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.
प्रियंका गांधी यांनी दिल्लीतील राजघाट येथील संकल्प सत्याग्रहात भाग घेऊन राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर दिल्लीत आयोजित संकल्प सत्याग्रहदरम्यान प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
यात त्यांनी या देशाच्या संविधानासाठी आमच्या कुटुंबाने रक्त सांडल्याचंही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. या देशाच्या संविधानासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत.असंही त्या म्हणाल्या.
प्रियंका गांधींच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना विवेक अग्निहोत्री म्हणाले, 'फॅमिली फॅमिली फॅमिली... तुम्ही काय केलं? कुटुंबासोबत इतकं खोटं प्रेम असेल, तर गांधी कुटुंबानं करण जोहरच्या चित्रपटात काम करायला सुरुवात करावी, अशी माझा सल्ला आहे. किमान कुटुंबाची इकोसिस्टम जुळेल. तो करण जोहरही बुडणार की नाही कुणास ठाऊक.
विवेक अग्निहोत्री यांनी प्रियंका गांधी वड्राबद्दल आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की- 'व्हिक्टिम कार्ड हा हक्कदाराचा पहिला आणि शेवटचा बचाव आहे'. अशातच रविवारी विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या वक्तव्यावरून प्रियांकावर हल्ला चढवला. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तर दुसरीकडे बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने राहुल गांधींचे समर्थन केले आणि भाजपवर निशाणा साधताना राहुल गांधी यांना आणख मजबूत होताना पाहून त्यांना स्पर्धेतूनच काढून टाकण्यात आल्याचं सांगितलं.
आता अग्नीहोत्री यांनी प्रियंका गांधी आणि काँग्रेसने राहुल यांच्या समर्थनार्थ सुरू केलेल्या सत्याग्रहावर प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांना कृती करण्याचा सल्ला दिला आहे. याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.