'अरुंधती'च्या हिंदी रिमेकमध्ये 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नावाची चर्चा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

मुंबई : साऊथ चित्रपटांच्या हिंदी रिमेकचा सध्या बॉलीवूडमध्ये बोलबाला आहे. विशेष म्हणजे साऊथचे हिंदी रिमेक चित्रपट बॉक्‍सऑफिसवर सुपरहिटही ठरतात. ‘कबीर सिंग’ चित्रपट याचेच एक उत्तम उदाहरण आहे.

दरम्यान सुपरहिट साऊथ चित्रपट ‘अरुंधती’ चा देखील हिंदी रिमेकची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा रंगत आहे. दरम्यान यात दीपिका ही मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

‘अरुंधती’ हा साऊथच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत दिसली होती.  आता दीपिकाच्या या नव्या चित्रपटाची अधिकृत घोषणा कधी होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

web title : Discussion about the famous actress' name in Arundhati's Hindi remake

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion about the famous actress' name in Arundhati's Hindi remake