जे होते ते चांगल्यासाठीच...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

धोनी बायोपिकनंतर दिशा दिसली ती सध्या गाजत असलेल्या "बागी 2' मध्ये. त्याआधी ती टायगरबरोबर असलेल्या रिलेशनशिपच्या अफवांमुळे लाईमलाईटमध्ये होती. "बागी 2' हिट ठरलाय. त्यामुळे दिशाने यशाची एक पायरी चढली आहे, असंच आपण म्हणूया. पण, इथंपर्यंत येण्यासाठी दिशाने खूप कष्ट केले आहेत. तेही स्वतःच्या बळावर. ती म्हणते, "मी माझे शिक्षण अर्धवट सोडून मुंबईत आले. तेव्हा कॉलेजला जाणाऱ्या मुलीला एका नवीनच शहरात येऊन राहणं फार सोप्पं नव्हतं.

मी मुंबईत आले तेव्हा माझ्याकडे फक्त 500 रुपये होते. मी एकटी राहत होते. एका काळानंतर माझ्याकडे पैसेच नव्हते. मी रोज अनेक ऑडिशन्सना जात असे; पण या सगळ्यामध्ये मला फक्त एकच गोष्ट माहीत होती की, मला काम मिळवायचंय नाही तर मी या महिन्याचं घराचं भाडं भरू शकणार नाही. मी अभिनय एन्जॉय करायला लागेपर्यंत मी फक्त त्याच्याकडे जॉब म्हणूनच पाहत होते. एका चित्रपटात काम मिळाले ज्यातून मी पदार्पण करणार होते. त्यामध्ये मला रिप्लेस करण्यात आलं; पण मला वाटतं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला अजून हिंमत देत असते.' 

Web Title: disha patani shared her experience