दिशापेक्षा सुंदर असणारी तिची बहिण आहे भारतीय सैन्यात अधिकारी

वृत्तसंस्था
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

तुम्हाला हे माहित आहे का दिशाची बहिण तिच्यापेक्षाही आहे खुप सुंदर. जाणून घ्या दिशाच्या बहिणीविषयी आणि पाहा तिचे लक्षवेधी फोटे.

मुंबई : बॉलिवूडमधली सर्वात सुंदर अभिनेत्री कोण हे ठरवणं नक्कीच कठीण आहे. पण, सुंदरतेसोबतच कोण फीट आहे याची नावं घेणं सोप्प आहे आणि त्यात आवर्जुन घेतलं जाणारं नाव म्हणजे दिशा पटानी ! दिशाने सोशल मीडियावर एखादा फोटो टाकला कि तो चांगलाच व्हायरल होतो. फिटनेस, डान्स, एक्सरसाईज, बॉक्सींग या सर्वांमध्ये दिशा एक्सपर्ट आहे. मात्र तुम्हाला हे माहित आहे का दिशाची बहिण तिच्यापेक्षाही आहे खुप सुंदर. जाणून घ्या दिशाच्या बहिणीविषयी आणि पाहा तिचे लक्षवेधी फोटे.

Image may contain: 2 people, people smiling, people standing

दिशाला मोठी बहिण आहे आणि तिचं नाव आहे खुशबू पटानी. या दोन बहिणींना एक धाकटा भाऊदेखील आहे. दिशा बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री आहे तर तिची बहिण काय करते हे ऐकुन तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. खुशबू भारतीय सेनेमध्ये अधिकारी आहे. होय, एकाच घरामधील या दोन बहिणींच्या कामामध्ये बरसचं अंतर आहे. 

Image may contain: 3 people, people smiling, people standing, selfie and close-up

असं असलं तरी खुशबू आणि दिशा त्यांच्या कामामध्ये चांगल्या पदावर आहेत याचं कौतुक म्हणावचं लागेल. दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर खुशबूचा भारतीय सेनेच्या पोशाखातला फोटो शेअर केला आहे.

Image may contain: 5 people, people smiling, people standing

हा फोटो पाहिल्यावर खुशबूचा नक्कीच हेवा वाटतो. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये खुशबूचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिखट प्रतिक्रिया देत दिशाला 'तिच्याकडून काहीतरी शिक' असा सल्ला दिला आहे.

Image may contain: 2 people, people smiling, close-up and indoor

दिशा आणि खुशबू यांच्या दिसण्यामध्ये बरसचं साम्य आढळतं. पण खऱ्या आयुष्यात आणि स्वभावामध्ये या दोघी अतिशय वेगळ्या आहेत. दिशा एक बिनधास्त आणि बोल्ड अशी अभिनेत्री आहे. शिवाय ती सोशल मीडियावर सतत अॅक्टीव असते. तर खुशबूचा स्वभाव याउलट आहे.

Image may contain: 3 people, people smiling, glasses and close-up

खुशबूचा स्वभाव अतिशय शांत आणि गंभीर आहे. शिवाय सोशल मीडियापासून ती दूर राहणंच पसंत करते. दिशा अभिनेत्री असल्याने सतत मीडिया आणि पॅपराझी यांच्या निशाण्यावर असते. याउलट खुशबू सामान्य माणसांप्रमाणे राहणं पसंत करते. दिशा तिच्या बाबांची लाडकी आहे तर खुशबू आईच्या खूप जवळ आहे. सर्व गोष्टी ती आईशी शेअर करते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

काही दिवसांपूर्वाच दिशा 'भारत' या चित्रपटामधून दबंगखान सलमानसोबत झळकली होती. दिशाने मोजकेच चित्रपट केले आहेत तरी मात्र तिची पसंती जास्त आहे आणि अभिनय कौतुकास्पद आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये ती 'मलंग' या चित्रपटातून झळकणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disha patni s sister is in Indian army see her beautiful pictures