दयाबेनची दमदार एन्ट्री!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

मागील दोन वर्षांपासून दयाबेन अर्थात दिशा वाकानी हिने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता.

मुंबई : 'तारक मेहता का उलटा चष्मा' या कार्यक्रमातील प्रसिध्द अभिनेत्री दयाबेन म्हणजेचं दिशा वाकानी. आपल्या अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहचली आहे.
मागील काही काळ तिने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. मात्र आता तब्बल दोन वर्षांनंतर दिशा वाकानी पुन्हा कम बॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे दयाबेनच्या ग्रँड एन्ट्रीकडे सर्वांचेच लक्ष आहे. दरम्यान दयाच्या पुन्हा पदार्पनावेळी प्रेक्षकांना मालिकेत एक नवीन ट्विस्ट देखील पाहायला मिळणार आहे.
  

कशी असणार दयाबेनची एन्ट्री?

मालिकेत सध्या नवरात्र उत्सवाची तयारी सुरु असून या उत्सवातच दयाबेन मालिकेत पुन्हा पदार्पण करणार आहे. दरम्यान सध्या शोमध्ये दाखवण्यात आले आहे की, जेठालाल दयाबेनसोबत बोलण्यास ठाम आहेत, परंतु त्याचा मेहूणा सुंदर त्या दोघांना बोलू देत नाही आहे. आता जेठालालला दयासोबत बोलायला मिळेल की नाही आणि नक्की कसे असेल दयाचे पदार्पण याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: disha wakani will join tmkoc soon