दिव्यांका-विवेक "शिव-पार्वती' 

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 जून 2017

"नच बलिये'च्या आठव्या सीझनमध्ये स्पर्धा वाढते आहे तसतसे स्पर्धक जोड्यांवरील दबावही वाढत आहे. दर आठवड्याला त्यांना काहीतरी वेगळे करावे लागते.

"ये है मोहब्बतें'फेम दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांनी आतापर्यंत परीक्षकांच्या आशा उंचावल्या आहेत. प्रत्येक भागात अप्रतिम परफॉर्मन्स करून त्यांनी स्वतःची वेगळी छाप पाडली आहे.

"नच बलिये'च्या सेटवर प्रत्येक आठवड्याला एका जोडीला चॅलेंज दिले जाते. या आठवड्यात दिव्यांका आणि विवेकला चॅलेंज मिळाले आहे. पुढच्या भागात ते शिव-पार्वतीच्या रूपात प्रेक्षकांना दिसतील. ते या वेळी तांडव नृत्य करणार आहेत. 

Web Title: Divyanka Tripathi and Vivek Dahiya to perform as Shiv and Parvati on the upcoming Nach Baliye 8