'क्राईम पट्रोल'ची नवी होस्ट, अनुप सोनीच्या जागी दिसणार 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 15 December 2020

नवीन घोषवाक्यासह हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहे. हे घोषवाक्य आता तुम्हाला तुमच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या तोंडून ऐकायला मिळणार आहे. 

मुंबई : 'क्राईम पट्रोल' हा टीव्ही शो छोट्या पडद्यावरिल सगळयात प्रसिद्ध शोपैकी एक आहे.  'क्राईम पट्रोल'ने आतापर्यंत लोकांना भारताचा तो चेहरा दाखवला जे पाहुन लोक सतर्क होऊ लागले. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोचे होस्ट अनुप सोनी यांनाही लोकांनी तितकंच प्रेम दिलं. अनुप सोनी यांचा 'सावधान रहिए, सतर्क रहिए' हा डायलॉग तर सगळ्यांना तोंडपाठ होता मात्र आता हा आवाज त्यांच्या चाहत्यांना ऐकायला मिळणार नाहीये.    

हे ही वाचा: 'त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता'ला रोनित अश्राने दिला नवीन तडका, हसून व्हाल लोटपोट    

'क्राईम पट्रोल'च्या प्रेक्षकांना आता 'न सहमेंगी, न डरेंगी, न रुकेंगी, जाग जाग नारी तू, एक औरत पर वार अब हर औरत का भार' या नवीन घोषवाक्यासह हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहे. हे घोषवाक्य आता तुम्हाला तुमच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या तोंडून ऐकायला मिळणार आहे. 

Anup Soni To RETURN To Crime Patrol Only On THIS Condition! - Filmibeat

छोट्या पडद्यावरिल प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीला प्रेक्षकांनी आत्तापर्यंत सून आणि मुलीच्या भूमिकेत खूप प्रेम दिलं. मात्र यावेळी दिव्यांका एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. दिव्यांका त्या महिलांची कहाणी घेवून येत आहे ज्यांनी अन्यायाविरोधात आपला आवाज उठवला. सोनी टीव्हीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये दिव्यांका 'क्राइम पट्रोल सतर्क'चा नवा चेहरा म्हणून प्रेक्षकांसमोर आली आहे. या प्रोमोसोबत '#WomenAgainstCrime दिव्यांका त्रिपाठीसोबत' असं कॅप्शन देण्यात आलं आहे. 

21 डिसेंबरपासून दिव्यांका त्रिपाठी 'क्राईम पट्रोल' हा कार्यक्रम होस्ट करणार आहे. प्रोमोमध्ये दिव्यांका स्त्रियांना जागरुक होण्याचा संदेश देतेय. हा प्रोमो अत्यंत प्रभावशाली असून दिव्यांकाला या नव्या रुपात पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. दिव्यांका त्रिपाठीचा 14 डिसेंबरला वाढदिवस असतो. या खास दिवशीच तिने चाहत्यांना हे गिफ्ट दिलं आहे. तिची प्रसिद्ध मालिका 'ये है मोहब्बते' संपल्यानंतर प्रेक्षक तिच्या नवीन शोसाठी उत्सुक होते.

divyanka tripathi turns host for crime patrol  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: divyanka tripathi turns host for crime patrol