छोट्याश्या इनायाने घरातंच काढली रांगोळी, सोहा अली खानने शेअर केले फोटो

दिपाली राणे-म्हात्रे
Sunday, 15 November 2020

सोहा अली खान आणि कुणाल खेमुची मुलगी इनाया आहे ते छोटीशी मात्र घर सजवण्याची वेळ आली तेव्हा ती स्वतः रांगोळी काढायला बसली. आई सोहा अली खानने याचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. 

मुंबई- दिवाळीच्या खास दिवशी प्रत्येकजण घर सजवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या करत असतो. लहान मुलांमध्ये तर प्रकाश आणि रंगांचा तर जास्त उत्साह पाहायला मिळतो. आता इनाया नौमी खेमुचंच पाहा ना. सोहा अली खान आणि कुणाल खेमुची मुलगी इनाया आहे ते छोटीशी मात्र घर सजवण्याची वेळ आली तेव्हा ती स्वतः रांगोळी काढायला बसली. आई सोहा अली खानने याचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. 

हे ही वाचा: निसर्गाच्या सान्निध्यात अशा प्रकारे दिवाळी साजरी करत आहेत करिना, सैफ आणि तैमुर..  

सोहा अली खानने इंस्टाग्राम स्टोरी मध्ये इनाया रांगोळी काढतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये ती जमिनीवर बसून रांगोळीच्या रंगांच्या पुड्या खोलत रांगोळी काढत आहे. मात्र रांगोळी काढताना ती एकटी नाहीये. तर तिच्या या हौसेमध्ये तिला मदत करण्यासाठी हाऊसहेल्प देखील आहे. सोहा अली खानने हे फोटो पोस्ट करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  

Diwali 2020: नन्हीं इनाया ने बनाई रंगोली, मम्मी सोहा अली खान ने शेयर की  खूबसूरत तस्वीरें inaaya naumi kemmu make rangoli at home mom soha share  pictures bollywood Tadka

लवकरंच पटौदी कुटुंबात आणखी एका लहानग्याचं आगमन होणार आहे. करिना कपूर खान दुस-यांना आई होणार आहे आणि यावेळी जर करिनाला मुलगी झाली तर इनायाला खेळण्यासाठी एका बहीणीच्या रुपात एक मैत्रीण देखील मिळेल. इनायाचे हे रांगोळी काढतानाचे फोटो सोहाने सोशल मिडियावर शेअर करताचा चाहत्यांमध्ये चांगलेच ट्रेंड होत आहेत. तसेही सोहा जेव्हा केव्हा इनायाचे फोटो पोस्ट करते ते सगळे फोटो चाहत्यांना तिच्या निरागसपणामुळे प्रेमात पाडतात.    

diwali 2020 inaaya naumi kemmu makes rangoli at home mom soha ali khan captures her  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: diwali 2020 inaaya naumi kemmu makes rangoli at home mom soha ali khan captures her