Diwali Festival 2019 : राणादा दिवाळीला पोहोचलाय घरी; कशी आहे त्याची दिवाळी?

अरुण सुर्वे
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

फटाके फोडताना प्राण्यांना इजा होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे शक्‍यतो फटाके फोडणे सर्वांनीच टाळले पाहिजे. माणुसकी जपूनच हा सण साजरा करा : हार्दिक जोशी

पुणे : तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या निमित्तानं घरा घरांत पोहोचलेला राणा दा अर्थात हार्दिक जोशी यंदा आपल्या घरी दिवाळी साजरी करत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वसगडे या गावात तुझ्यात जीव रंगला मालिकेचं शुटिंग सुरू असतं. त्यामुळं कोल्हापुरात तात्पुरतं वास्तव्य असेलला हार्दिक दिवाळीनिमित्त घरी आलाय.

फटके मुक्त दिवाळी करा
याबाबत सकाळशी बोलताना हार्दिक जोशी म्हणाला, 'मी माझ्या कुटुंबीयांसमवेत दिवाळीचा सण साजरा करत आहे. मी आईला घरी साफसफाईसाठी, फराळात चकल्या आणि शंकरपाळ्या करायला मदत करायचो; पण चित्रीकरणामुळे फारशी मदत करता येत नाही. आम्ही पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करतो. फटाके फोडताना प्राण्यांना इजा होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे शक्‍यतो फटाके फोडणे सर्वांनीच टाळले पाहिजे. माणुसकी जपूनच हा सण साजरा करा.'

राणादा झालाय पोलिस
तुझ्यात जीव रंगला ही हार्दिकची मालिका एका वेगळ्या वळणावर आहे. राणादाच्या कॅरेक्टरनं पुनरागम केलंय आणि आता राणादा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. याविषयी सिरीअलच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सोशळ मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या हार्दिकनं या सस्पेन्सविषयी एक व्हिडिओ त्याच्या इन्स्टा अकाउंटवर पोस्ट केलाय. त्यामुळं सिरीअलमधील या सस्पेन्सचीही सध्या चर्चा सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali Festival 2019 marathi serial actor hardik joshi diwali celebration tujhyat jiv rangla