असा सुपरहिरो होणे नाही 

वृत्तसंस्था
शनिवार, 24 जून 2017

राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेला "क्रिश' चित्रपट प्रदर्शित होऊन 11 वर्षे झाली; पण अजूनही बॉलीवूडमध्ये क्रिशसारखा सुपरहिरो होऊ शकलेला नाही. या सायन्स फिक्‍शन चित्रपटात ऋतिक रोशनने क्रिश या सुपरहिरोची भूमिका साकारली होती.

बॉलीवूड समीक्षकांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंतचा यशस्वी आणि मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना भावलेला सुपरहिरो म्हणून क्रिशचे नाव घेतले जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा सुपरहिरो आवडला होता. तो मास्क घालून त्याच्या वेशभूषेत आकाशात उंच झेप घेतो आणि लोकांना वाचवतो. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतो.

हे थिएटरमध्ये पाहताना प्रेक्षक सुखावले होते. आता अशी चर्चा आहे की आगामी "हृदयांतर' या मराठी चित्रपटात ऋतिक पुन्हा क्रिशच्या अंदाजात दिसणार आहे आणि तो त्या कथेचाच एक भाग आहे. अतिशय लोकप्रिय अशा या क्रिशचा लवकरच चौथा भाग येणार आहे. त्याची आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे. 
 
Web Title: Do not be such a superhero