या स्टार्सचं पहिलं काम, पहिला पगार तुम्हाला माहितीय?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

करीअरच्या सुरुवातीला आजच्या सुप्रसिद्ध कलाकारांनी कधी काळी नोकरी केली आहे. जाणून घ्या बॉलिवूडच्या कोणत्या कलाकारांनी नोकरी केली आहे आणि त्यांचा पगार किती होता ! 
 

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमवणे नक्कीच सोपं काम नाही. त्यापलीकडे कोणत्याही कलाकारासाठी ओळख मिळवणे किंवा इंडस्ट्रीमध्ये जागा निर्माण करणे अत्यंत कठीण आहे. स्टारकिड्सवर नेहमीच 'नेपोटिझम' चा टीका केली जाते. मात्र इतर कलाकार वर्षानोवर्षे मेहनत करुन स्वबळावर आपलं नाव कमवतात. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचण्यापूर्वी काही कलाकारांनी वेगवेगळ्या प्रकाराचं काम केलं आहे. करीअरच्या सुरुवातीला आजच्या सुप्रसिद्ध कलाकारांनी कधी काळी नोकरी केली आहे. जाणून घ्या बॉलिवूडच्या कोणत्या कलाकारांनी नोकरी केली आहे आणि त्यांचा पगार किती होता ! 
Image may contain: 2 people, people smiling, people standing

1. रकुल प्रित सिंह
दाक्षिणात्य अभिनेत्री आणि बॉलिवूडमध्ये सध्या वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री रकुल प्रित सिंह ही सध्या अभिनय क्षेत्रात उच्च स्थानावर आहे. रकुल मुळची दिल्लीची आहे आणि अभिनयात तिला पहिल्यापासून रस होता. पहिल्यांदा तिच्या घरातून अभिनय क्षेत्रासाठी विरोध होता. मात्र रकुलचं काम पाहून त्यांनी पाठिंबा दिला. रकुलने अभिनयात पदार्पण झाल्यानंतर ‘गीली’ हा दाक्षिणात्य चित्रपट केला. त्यानंतर बरीच वर्षे  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तिनं काम केलं. ‘युवान’, ‘पुथागंम’, ‘केरातम’ यासारखे चित्रपट केले. त्यानंतर ‘यारिया’ या चित्रपटातून रकुलनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

चित्रपटसृष्टीमध्ये पोहोचण्याचा तिचा प्रवास असा होता. मात्र त्याआधी रकुलने तिच्या करीअरची सुरुवात एका मॅगजीनच्या शुटने केली होती. हे शुट कपड्याच्या एका ब्रॅंडसाठी होतं. तिच्या या पहिल्या वहिल्या शुटसाठी 5,000 रुपये मिळाले होते. हे पैसे रकुलने सांभाळून ठेवले होते आणि 25000 रुपये जमा होण्यापर्यंत ते तिनं सांभाळून ठेवले होते. जमा केलेल्या 25000 रुपयांमधून तिने वडिलांच्या वाढदिवसाचं गीफ्ट घेतलं. 
Image may contain: 1 person, hat

2. दिलजित दोसांज
पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजित दोसांज त्याच्या अनेक पंजाबी आणि हिंदी गाण्यांसाठी ओळखला जातो. तसेच, तो ‘उडता पंजाब’, ‘फिलौरी’, ‘वेलकम टू न्यूयॉर्क’सारख्या हिंदी चित्रपटांत झळकला आहे. त्याच्या गाण्याचे लाखो फॅन्स आहेत. प्रसिद्ध गायक आणि बॉलिवूडमध्ये आपलं स्थान मिळवळ्यापूर्वी  त्यानं बऱ्याच वर्षांपूर्वी एका बर्थडे पार्टीमध्ये गाणं म्हणून पहिले 5000 रुपये कमवले होते. कमवलेले अर्धे पैसे त्याने गुरुद्वारामध्ये दिले. तर, अर्ध्या पैशातून शेजारच्या अंतर सिंह नावाच्या मुलाला साइकल घेऊन दिली. अंतरच्या आई- वडिलांचं निधन झालं होतं आणि दिलजितने पहिल्या पगारातून साइकल घेऊन देण्याचं वचन केलं होतं. 

Image may contain: 2 people, people standing

3. शिल्पा शेट्टी 
नियमित व्यायाम, योग आणि सकस आहार यासह स्वत: ला फिट ठेवणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. आनंदी जीवन जगण्यासाठी 'स्वस्थ रहा, मस्त रहा' हाच आरोग्यमंत्र आहे असा आरोग्यमंत्र तिनं दिला आहे. अभिनय क्षेत्रात तिने उत्तम कामगिरी निभावली आहेच त्याचसोबत आता ती एक आर्दश बायको आणि सुपरकुल मॉम देखील आहे. शिल्पाला बघून तिला एक मुलगा आहे हे म्हणणं अवघडच आहे. 

एका मुलाखतीदरम्यान तिने करीअरच्या प्रवासाविषयी सांगितलं होतं. एका जाहिरातीच्या शुटसाठी तिनं काम केलं होतं. त्यासाठी तिला पैसे मिळाले होते मात्र त्याची रक्कम तिला लक्षात नाही. कमवलेले पहिले पैसे तिने आईकडे सोपवले होते. शिल्पाच्या आईने ते पैसे सांभाळून ठेवले आणि कधीच खर्च केले नाही. असं असलं तरी मात्र शिल्पाने तिच्या मोठ्या कमाईतून ब्रॅन्डेड बेल्ट घेतला होता. त्याची किंमत जवळपास 200 डॉलर्स इतकी होती. 

Image may contain: 1 person

4. मल्लिका शेरावत
आता नंबर येतो ते बॉलिवूडच्या त्या बोल्ड, बिनधास्त आणि सुंदर अभिनेत्रीचा, ती म्हणजेच मल्लिका शेरावत. या अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी स्वत:चं स्वयंवरही रचलं होतं. अनेकदा मल्लिका तिच्या बोल्ड विधानांनी चर्चेमध्ये असते. फक्त अभिनयासाठी नाही तर इतर सामाजिक विषयांवरही ती पुढाकाराने आवाज उठवते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 #weekendvibes Gown @georgeshobeika

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

मल्लिकाने तिच्या करीअरची सुरुवात एका जाहिरातीच्या शुटींगने केली होती. या जाहिरातीमध्ये तिने बॉलिवूडचा किंग खान शाहरुखसोबत काम केलं होतं. या पहिल्या कामातून तिला चांगले पैसै मिळाल्याचं ती सांगते. रक्कम तिच्या लक्षात नसली तरी त्या पैशातून मल्लिकाने एक ड्राईव्हर ठेवला होता. त्यावेळी मल्लिकाकडे कार तर होती मात्र ड्राईव्हर नव्हता. 

Image may contain: 4 people, people smiling, people standing

5.  करण सिंह ग्रोवर
'कसौटी जिंदगी की' या मालिकेत तब्बल 18 वर्षांनंतर श्री. बजाज या गाजलेल्या व्यक्तिरेखेचा प्रवेश झाला.  2001 मध्ये या व्यक्तिरेखेने या मालिकेत खूपच उलथापालथ घडवून आणली होती. या मालिकेचे नव्या संचात प्रसारण सुरू झाल्यापासून बजाजची भूमिका कोणता कलाकार साकारणार, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती आणि अनेक कलाकारांच्या नावांची चर्चाही होत होती. करणसिंह ग्रोव्हर हा तगडा कलाकाराने ती भूमिका साकारली. त्याशिवाय करणने बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले. दोन वेळा घटस्फोट असूनही करण पुन्हा प्रेमात पडला आणि अभिनेत्री बिपाशा बासू हिच्याशी लग्न केलं. 

बिपाशा आणि अभिनेता जॉन अब्राहिम बरेच वर्षे एकमेकांना डेट करत होते. ते लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चाही होती. मात्र काही कारणांनी ते दोघं वेगळे झाले. बिपाशा त्यानंतर करण सिंह ग्रोवरला डेट करत होती. आता त्या दोघांनी लग्नही केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

The Monkeys!  #sheisbreathtaking #grateful #monkeylove

A post shared by karan singh grover (@iamksgofficial) on

दुबईच्या एका हॉटेलमध्ये नोकरी करत होता. त्यासाठी त्याला 125 रियाल मिळायचे. त्यानंतर मेहनतीने त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 'कितनी मस्त है जिंदगी' या मालिकेपासून त्याने करीअरला सुरुवात केली. त्यासाठी दरमहा करणला 25 हजार रुपये मिळत असत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do you know first work, first salary of these actors