Don’t Look Up ची स्टारकास्ट पाहिली आहे ?; एकापेक्षा एक सरस कलाकारांची फौज

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 15 October 2020

या चित्रपटात प्रख्यात अभिनेता लिओर्नादो डिकॅप्रिओ, मेरियल स्ट्रिप, टिमोथी चालमेट यांच्याशिवाय जेनिफर लॉरेन्स, रॉब मॉर्गन, केट ब्लेन्चेट, जोनाथ हिल, हिमेश पटेल, अरिना ग्रँडी हे यात दिसणार आहे. एकावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात स्टार कास्टिंग करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई - बराच काळापासून चर्चेत असलेला Don’t Look Up या नवीन चित्रपटाची स्टारकास्टचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात एकापेक्षा एक सरस कलाकारांची फौज चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटसचा पाऊस पडला आहे. दोन अंतराळवीरांची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अॅडम मॅकी यांनी केला आहे. 

या चित्रपटात प्रख्यात अभिनेता लिओर्नादो डिकॅप्रिओ, मेरियल स्ट्रिप, टिमोथी चालमेट यांच्याशिवाय जेनिफर लॉरेन्स, रॉब मॉर्गन, केट ब्लेन्चेट, जोनाथ हिल, हिमेश पटेल, अरिना ग्रँडी हे यात दिसणार आहे. एकावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात स्टार कास्टिंग करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी लॉरेन्स आणि मॉर्गन यांनी काही कलाकारांची नावे जाहीर केली होती. आता त्यानंतरच्या सहभागी कलाकारांची नावे नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर जाहीर केली आहेत.

कॉमेडी प्रकारातील चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत आहे. मात्र त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. अॅडम हे चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. त्यांनीच पटकथेचेही लेखन केले आहे. त्यांनी यापूर्वी अँकरमॅन, द बिग शॉर्ट, व्हाईस यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. 

Don't Look Up - Movie Official (2020) First Look Jennifer Lawrence, Adam  Mckay's New Netflix Movie - YouTube

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do You See the starcast of Dont Look Up