'डोक्याला शॉट' द्यायला येतोय हा चित्रपट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

सुव्रत जोशी, रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन, गणेश पंडित या चार जीवलग मित्रांच्या एका धमाल गोंधळाची गोष्ट असलेला 'डोक्याला शॉट' हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करेल अशी अपेक्षा ट्रेलर पाहिल्यानंतर तरी व्यक्त केली जाऊ शकते.

'डोक्याला शॉट' देणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचे नावच 'डोक्याला शॉट' असे आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते लाँच करण्यात आला.

मुंबईत झालेल्या या सोहळ्यात रितेश देशमुख यांच्यासह कैलाश खेर देखील उपस्थित होते. कार्यक्रमात ट्रेलर सोबत चित्रपटाच्या संगीताचेही कैलास खेर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.  

चार मित्रांच्या आयुष्यात काही घटना घडतात आणि त्यातून सुरु होतो 'डोक्याला शॉट'. सुव्रत जोशी, रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन, गणेश पंडित या चार जीवलग मित्रांच्या एका धमाल गोंधळाची गोष्ट असलेला 'डोक्याला शॉट' हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करेल अशी अपेक्षा ट्रेलर पाहिल्यानंतर तरी व्यक्त केली जाऊ शकते.

dokyala shot

अभिजीत (सुव्रत जोशी) आणि सुब्बलक्ष्मी (प्राजक्ता माळी) हे एकमेकांच्या प्रेमात असतात. त्यांचे लग्न ज्या दिवशी होणार असते त्याच्या आदल्या दिवशीच एक घटना घडते, आणि त्यातून संपूर्ण चित्रपटाला कलाटणी मिळते. अभिजीत आणि त्याचे मित्र यांची या घटनेतून जी काही तारांबळ उडते आणि त्यातून सावरताना जी धमाल होते ती म्हणजे 'डोक्याला शॉट'. एकमेकांना या गोष्टीत सांभाळून घेताना त्या सर्व मित्रांची होणारी तारेवरची कसरत आणि त्यातून घडणारे विनोद यांचे अगदी धमाल मजेदार चित्रण या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लेखक आणि दिग्दर्शक गणेश पंडित हे या चित्रपटाद्वारे त्यांचे अभिनय कौशल्य दाखवणार आहे. 

या चित्रपटाबद्दल रितेश म्हणाले  की, "हा चित्रपट पाहताना मी फक्त खुर्चीतून खाली पडायचे बाकी होते, इतका मी हसत होतो. आपण आयुष्यात एकच गोष्ट खरी कमावतो आणि ती म्हणजे 'मैत्री'. आपली खरी मैत्री आपल्यासोबत शेवटपर्यंत असते. त्यामुळे अशा जिव्हाळ्याच्या विषयावर असलेला हा चित्रपट तुम्ही नक्की बघा." 

dokyala shot

'डोक्याला शॉट' या चित्रपटाची निर्मिती उत्तुंग ठाकूर यांनी केली आहे. गुरु ठाकूर आणि चेतन सैंदाणे यांनी या चित्रपटातील गाणी लिहली आहे. त्यांच्या शब्दांना अमितराज, श्रीकांत-अनिता यांनी संगीतबद्ध केले आहे. तर मिका सिंग, कैलास खेर या दिगज्ज गायकांनी त्या गाण्यांना आपला आवाज दिला आहे. नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर यांनी चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाला रोहन-विनायक यांनी पार्श्वसंगीत दिले आहे तर सुमन साहू यांनी या सिनेमाचे छायाचित्रण केले आहे. 

dokyala shot


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dokyala shot marathi film trailer release