आमीरला न आवडे हॉलीवूड 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

एकीकडे बॉलीवूडची पिग्गी चॉप्स ऊर्फ प्रियांका चोप्रा आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्यासह काही सेलेब्स भारताचा झेंडा अटकेपार रोवत आहेत; पण दुसरीकडे बॉलीवूडचा मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमीर खानला हॉलीवूडमध्ये काम करण्यात रुची नाही. मात्र, भविष्यात चांगला आंतरराष्ट्रीय प्रोजेक्‍ट मिळाल्यास करण्याचा विचार करेन, असे तो म्हणाला. याबाबत त्याने सांगितलं की, "अमेरिकेत जाऊन काम करण्यात अजिबात स्वारस्य नाही. मला फक्त भारतीय चित्रपट करायचेत. इथल्या रसिकांशी माझं पंचवीस वर्षांपासूनचं नातं आहे. या नात्याला मी खूप महत्त्व देतो. कलेला कोणतीही सीमा नसते.

एकीकडे बॉलीवूडची पिग्गी चॉप्स ऊर्फ प्रियांका चोप्रा आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्यासह काही सेलेब्स भारताचा झेंडा अटकेपार रोवत आहेत; पण दुसरीकडे बॉलीवूडचा मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमीर खानला हॉलीवूडमध्ये काम करण्यात रुची नाही. मात्र, भविष्यात चांगला आंतरराष्ट्रीय प्रोजेक्‍ट मिळाल्यास करण्याचा विचार करेन, असे तो म्हणाला. याबाबत त्याने सांगितलं की, "अमेरिकेत जाऊन काम करण्यात अजिबात स्वारस्य नाही. मला फक्त भारतीय चित्रपट करायचेत. इथल्या रसिकांशी माझं पंचवीस वर्षांपासूनचं नातं आहे. या नात्याला मी खूप महत्त्व देतो. कलेला कोणतीही सीमा नसते. भविष्यात मनोरंजक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्‍ट मिळाल्यास जरूर करेन. वैश्‍विक पातळीवर लोकांचं मनोरंजन करणं ही चांगलीच गोष्ट आहे. मला जपानमधून एखादा प्रस्ताव मिळाला आणि तो चांगला प्रस्ताव असेल तर मी तो नक्कीच स्वीकारेन.' 

Web Title: Don’t have any interest in going to Hollywood: Aamir Khan