"डॉन'चा तिसरा भाग 

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 जून 2017

1978 मध्ये नरिमन इरानी दिग्दर्शित व अमिताभ बच्चन अभिनित डॉन चित्रपटाच्या रिमेकचे अधिकार फरहान अख्तर व रितेश सिद्धवानी यांची कंपनी एक्‍सेल एण्टरटेन्मेंटने विकत घेतले.

मग त्यांनी 2006 मध्ये शाहरूख खानला घेऊन "डॉन' चित्रपटाची पुनर्निर्मिती केली. त्यांनी कथेत बराच बदल केला होता. त्यासाठी त्यांनी लेखक सलीम खान यांची मदत घेतली. प्रेक्षकांनी डॉनच्या रूपात अमिताभ बच्चन यांना जेवढी पसंती दिली तितकी शाहरूखला मिळाली नाही. मात्र डॉनच्या रिमेकने बॉक्‍स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यानंतर 2011 मध्ये फरहान अख्तरने या चित्रपटाचा "डॉन 2' सिक्वेल बनवला. त्यालाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

आता सूत्रांकडून समजतंय की, या चित्रपटाचा तिसरा भाग बनवण्याची तयारी सुरू आहे. याबाबतची माहिती निर्माता रितेश सिद्धवानी यांनी दिली की, आम्ही "डॉन 3' बनवण्याचा विचार करीत आहोत. त्यासाठी आम्हाला छान कल्पना सुचली असून त्याचे लिखाण सध्या सुरू आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. मात्र त्यांनी डॉन 3 मध्ये शाहरूख खान असेल की नाही, याबाबत काहीच सांगितले नाही. 
 
Web Title: don movie 3rd part