'हात लावू नका, मी आता सेलिब्रिटी आहे', चाहतीवर भडकल्य़ा रानू मंडल !

वृत्तसंस्था
Tuesday, 5 November 2019

रानू याचं आयुष्यच पूर्णपणे बदललं, त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र याच लोकप्रियतेमुळे त्यांचं वागणं बदललं असल्याचं अनेकांच मत आहे. 

मुंबई : रानू मंडल या रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या महिलेचा गायक होण्यापर्यंतचा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे. कोलकातामधील रेल्वे स्टेशनवर मधुर आवाजात गाणं गात असताना एका माणसाने त्यांचा व्हिडीओ इंटरनेटवर शेअर केला. त्यानंतर, रातोरात रानू मंडल इंटरनेट सेंसेशन बनल्या. हाच व्हिडीओ पाहून गायक हिमेश रेशमियाने त्यांना गाण्याची ऑफर दिली. सलग तीन अल्बममध्ये रानू मंडल यांनी गाणं गायलं. त्यानंतर रानू याचं आयुष्यच पूर्णपणे बदललं, त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र याच लोकप्रियतेमुळे त्यांचं वागणं बदललं असल्याचं अनेकांच मत आहे. 

Image may contain: 1 person, smiling

सध्या इंटरनेटवर रानू मंडल यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये रानू मंडल एका सुपरमार्केटमध्ये खरेदी करताना दिसत आहेत. त्याचवेळी रानू मंडल यांना एक महिला हाताला स्पर्श करत सेल्फीसाठी विनंती करते. मात्र त्या महिलेचं हाताला स्पर्श करणं रानू मंडल यांना आवडलं नाही.  तिच्या या वागण्याचा राग येऊन रानू मंडल तिच्यावर रागवल्याचे या व्हिडीओमध्ये दिसते.

महिलेवर चाहतीवर नाराजगी व्यक्त करताना म्हणाल्या,' अशाप्रकारे मला हाताला स्पर्श करत आवाज का देता आहात ? काय आहे हे ? अशाप्रकारे रानू मंडल यांनी त्या महिलेला चांगलचं सुनावलं. रानू यांना सेल्फीसाठी विचारणारी ती महिला फक्त आश्चर्याने त्यांच्याकडे पाहताना दिसत आहे. 

Image may contain: 3 people, people smiling

रानू मंडल यांच्या वागण्यावर नेटकरी नाराज
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रानू मंडल यांच्या अशाप्रकारच्या वागण्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तुम्हाला जे स्थान मिळालं आहे त्याचा निदान आदर करा असा सल्ला अनेकांनी रानू मंडल यांना दिला. चाहत्यांना अशाप्रकारे वागणूक देणं अतिशय निंदनीय आहे असं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. 

Image may contain: 2 people, people smiling

रानू मंडल यांच्यावर तयार होणार चित्रपट
रानू मंडल यांचा आजवरचा प्रवास नक्कीच खडतर होता. आपल्या आवाजाने त्यांनी सर्वांनाच भुरळ घातली. त्यांच्या जीवनाची कथा ऐकुन प्रेरित झालेल्या चित्रपट निर्माता ऋषिकेश मंडलने त्यांच्या जीवनावर आधारीत  एक चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont touch me I am celebrity now ranu mondal got angry on lady fan