सलमानचा डबल धमाका!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

सलमान खान सध्या खूपच बिझी आहे. 'रेस 3' चे प्रमोशन आणि त्याचे आगामी चित्रपट. खरं तर तो या वर्षी साधारण चार चित्रपटांसाठी चित्रीकरण करतोय असे म्हणता येईल. भारत, दबंग ३, डान्सिंग डॅडी, किक २ असे काही त्याचे आगामी चित्रपट पाईपलाईनमध्ये आहेत.

नुकतेच ‘दस का दम’ या शोमधून सलमानने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. हे दोन प्रोजेक्‍ट्‌स सुरू आहेतच. त्यामध्ये आता त्याला दबंग 3 चे चित्रीकरण सुरू करावे लागणार आहे. भारत चित्रपटाचा काही भाग त्याने चित्रीत केला आहे; पण अजून बरेच चित्रीकरण बाकी आहे. त्यामुळे दबंग ३ आणि भारत या चित्रपटांसाठी सलमान एकाचवेळी काम करणार आहे. त्यामुळे कधी इथे तर कधी तिथे अशी सलमानची अवस्था होणार आहे. बघू सलमान कसं काय जमवतोय ते!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: double dhamaka by salman khan