उर्वशीसाठी दुहेरी आनंदसोहळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

ती म्हणते, 'हा माझा दक्षिणेतला पहिला चित्रपट आहे आणि मी स्वत:ला हा पुरस्कार स्वीकारताना खूप भाग्यवान समजते.'

'सारा जमाना... हसीनों का दिवाना...' या गाण्यातून उर्वशी रौतेलाने आपला जलवा अख्ख्या बॉलिवूडला दाखवला. तिच्यासाठी दुहेरी आनंदसोहळा आहे. तिला दक्षिणेमध्ये नुकतेच दोन पुरस्कार मिळाले. तिने तिच्या कन्नड चित्रपटात पदार्पण केलेल्या चित्रपटासाठी आणि बॉलिवूडमधल्या योगदानासाठी स्पेशल ज्युरी अॅवॉर्ड मिळाले आहे.

उर्वशीसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. ती म्हणते, 'हा माझा दक्षिणेतला पहिला चित्रपट आहे आणि मी स्वत:ला हा पुरस्कार स्वीकारताना खूप भाग्यवान समजते. माझ्या भूमिकेसाठी मला जितकं प्रेम मिळतं आहे, त्याने मी भारावून गेले आहे.

मला आणखी दाक्षिणात्य चित्रपट करायला मिळाले तर खूप आनंदच होईल. तिने 'सिंग साब द ग्रेट' या सनी देओल बरोबरच्या चित्रपटातून पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं म्हणून तिने पुरस्कार स्वीकारताना देओल कुटुंबाचेही आभार मानले.

 
Web Title: double joy for urvashi rautela