Double XL: 'मी खूप हावरट झालीये'! असं का म्हणतेय सोनाक्षी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Double XL Sonakshi Sinha news

Double XL: 'मी खूप हावरट झालीये'! असं का म्हणतेय सोनाक्षी?

Sonakshi Sinha News: प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी ही आता तिच्या आगळ्या वेगळ्या विषयावरील चित्रपटामुळए चर्चेत आली आहे. डबल एक्स एल असे त्या चित्रपटाचे नाव असून त्यामध्ये हुमा कुरेशीनं देखील अभिनय केला आहे. बॉडी शेमिंग सारख्या विषयावरील या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटलीला येणार आहे.

प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत असल्याचे दिसून आले आहे. सोनाक्षी आणि हुमानं गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले आहे. पुरुषी मानसिकता, इतक्या वर्षानंतरही त्याच्या मानसिकतेत काडीचाही फरक न पडणे, त्याच्या दृष्टीनं स्त्री ही केवळ उपभोग्य वस्तु आहे. या मानसिकतेवर सडेतोडपणे या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. त्यामुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे. आता यासगळ्यात सोनाक्षीची पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.

सोनाक्षी आपल्या पोस्टमध्ये म्हणते की, मी आता खूप हावरट झाली आहे. मला खूप हाव सुटली आहे. सोनाक्षीनं अशा प्रकारे विधान करणं हे तिच्या चाहत्यांसाठी धक्कादाय़क बाब होती. अभिनेत्रीनं या चित्रपटासाठी स्वतामध्ये खूप काही बदल केले आहेत जे तिला अपेक्षित नव्हते. बऱ्याचदा आपण काही गोष्टींसाठी अॅडजस्टमेंट करतो मात्र एखादा विषय मनाला भावला तर त्याच्यासाठी काहीही करण्यास तयार होतो. असे त्या पोस्टमधून सोनाक्षीनं आपल्या नेटकऱ्यांना सांगितलं आहे.

हेही वाचा: Double XL Trailer: 'मुलांना ब्रा मोठी हवी पण कंबर बारीक'!

हुमानं आणि सोनाक्षीनं वेगवेगळ्या माध्यमातून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पिंकव्हिलाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हणते की, कोरोनामुळे आता प्रेक्षकांच्या आवडीनिवडीमध्ये देखील खूप फरक पडला आहे. कलाकारांना देखील सातत्य़ानं आव्हानात्मक परिस्थितीमध्ये राहावे लागत आहे. ते साहजिकच आहे. कारण प्रेक्षक देखील कमालीचे सतर्क झाले आहेत. त्यांच्याकडे निवडीचा अधिकार आहे. त्यामुळे कलाकारांनाच अपडेट राहावे लागत आहे. त्यामुळे मी आता चित्रपट आणि त्या चित्रपटातील भूमिका स्विकारण्यासाठी खूप हावरट झाली आहे. असे सोनाक्षीनं म्हटले आहे.

हेही वाचा: Ketki Chitale: केतकी पुन्हा आली! फेसबूक 'ॲक्सिस' मिळाला