नवीन रूपात डॉ. आशीष गोखले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

"तारा फ्रॉम सातारा' या मालिकेत वरुण माने ही भूमिका साकारत असलेल्या डॉ. आशीष गोखले यानेही अशीच निष्ठा दाखवली आहे. कॉलेजपासून वेट ट्रेनिंग करत असलेल्या आशिषने आपले शरीर पिळदार दिसण्याऐवजी सडपातळ दिसण्यासाठी व्यायामाचा प्रकार बदलला आहे.
 

आपल्या भूमिकांना न्याय देण्यासाठी अभिनेते वेळोवेळी आपला लूक आणि शरीरयष्टीबाबत प्रयोग करत असतात. "तारा फ्रॉम सातारा' या मालिकेत वरुण माने ही भूमिका साकारत असलेल्या डॉ. आशीष गोखले यानेही अशीच निष्ठा दाखवली आहे. कॉलेजपासून वेट ट्रेनिंग करत असलेल्या आशिषने आपले शरीर पिळदार दिसण्याऐवजी सडपातळ दिसण्यासाठी व्यायामाचा प्रकार बदलला आहे.

डॉ. आशीष साताऱ्यातील एका मध्यमवर्गीय माणसाची भूमिका साकारत आहे. ही व्यक्तिरेखा कोण्या दमदार पुरुषाची नाही. त्यामुळे मालिकेत त्याचे शरीर पिळदार दिसणे चुकीचे वाटले असते. त्यासाठी त्याला आपली शरीरयष्टी सडपातळ करणे आवश्‍यक होते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तो कार्डिओ कसरतीकडे वळला. शिवाय त्याने आपला वैद्यकीय व्यवसायही सुरू ठेवला आहे.
 
याबाबत आशिष म्हणाला, ""अभिनय आणि डॉक्‍टरी दोन्ही मला प्रिय आहे. आयुष्यात या दोन्हींची सोबत ठेवण्याचा मी प्रयत्न करत असतो. चित्रीकरण संपल्यानंतर मी दवाखान्यात जातो. विशेष म्हणजे मला जराही थकवा जाणवत नाही. कारण या दोन्ही गोष्टी मला विसावा देणाऱ्या आहेत.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Ashish Gokhale New Role in Tara From Satara Serial