'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेसह 'या' दोन मालिकांनीही केला मुंबईत शुटिंगचा श्रीगणेशा

दिपाली राणे-म्हात्रे, प्रतिनिधी
सोमवार, 29 जून 2020

सेटवर कोरोनासंबंधिचे सगळे नियम पाळत या शूटिंग्सना सुरुवात झाली आहे. यातंच आता आणखी काही मराठी मालिकांचा समावेश झाला आहे.

मुंबई- कोरोनामुळे तीन महिने संपूर्ण सिनेइंडस्ट्री ठप्प होती. मात्र आता हळूहळू सर्व कामं पूर्वपदावर येण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अनेक हिंदी-मराठी मालिकांच्या शूटींगला सुरुवात करण्यात आली आहे. सेटवर कोरोनासंबंधिचे सगळे नियम पाळत या शूटिंग्सना सुरुवात झाली आहे. यातंच आता आणखी काही मराठी मालिकांचा समावेश झाला आहे. यात लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते', 'मोलकरीण बाई' आणि 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेच्या शूटिंगला आता सुरुवात झाली आहे. 

हे ही वाचा: शाहरुखच्या फोटोवर अर्शद वारसी म्हणाला, 'हा कोणालाही गे बनवू शकतो..'

सर्व मालिकांच्या सेटवर नियमाचं पालन केलं जातंय. कोणत्या सेटवर कशी सुरुवात होतेय याची माहिती त्या मालिकेतील कलाकार त्यांच्या सोशल साईट्सवरुन देत आहेत. शूटिंग सुरू होण्यापूर्वी कलाकारांच्या मेकअप रूम आणि संपूर्ण सेट सॅनिटाईज करण्यात आला आहे. सरकारी सुचनांचं पूर्णपणे पालन करत या तीनही मालिकांच्या सेटवर शूटिंगचा श्रीगणेशा करण्यात आला आहे.

कलाकारांसाठी सेट म्हणजे दुसरं घर असतं असं ते अनेकदा म्हणतात कारण घरापेक्षा जास्तवेळ ते सेटवरंच घालवत असतात. तसंच तिथे एक दुसरं कुटुंबच तयार होत असतं. आता तर लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांपेक्षा जास्त काळानंतर कलाकार सेटवर पुन्हा हजेरी लावत आहेत. त्यामुळे या कलाकारांमध्ये देखील आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. 

'आई कुठे काय करते' मालिकेत आई म्हणजेच अरुंधतीची भूमिका साकारणारी मधुराणी गोखले प्रभुलकर आपल्या सेटवरच्या कुटुंबाला भेटून भारावून गेल्या होत्या. 'संपूर्णपणे काळजी घेत आम्ही शूटिंगला सुरुवात केली आहे. लवकरच नव्या भागासह आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येऊ' असं मधुराणी म्हणाली.

तर 'मोलकरीण बाई' मालिकेत अंबिका ही भूमिका साकारणाऱ्या सुप्रिया पाठारे म्हणाल्या, 'मी सेट, मेकअप रुम आणि माझ्या सहकलाकारांना खूप मिस केलं. आता शूटला सुरुवात झाली आहे, त्यामुळे आनंद आहे. आम्ही स्वत:ची आणि एकमेकांची काळजी घेत शूटिंग करत आहोत. प्रेक्षकांना पुन्हा भेटण्यासाठी मी उत्सुक आहे अशी भावना सुप्रिया पाठारे यांनी व्यक्त केली.'

dr babasaheb ambedkar and two more marathi serials started shooting in mumbai  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr babasaheb ambedkar and two more marathi serials started shooting in mumbai