अत्रेंचा पहिला 'प्याला' पुण्यात

टीम ई सकाळ
शुक्रवार, 2 जून 2017

पुणे : गडकऱ्यांनी लिहिलेले एकच प्याला हे नाटक तुफान लोकप्रिय ठरले. यातील सुधाकर, तळीराम, रामलाल, सिंधू या सर्वच पात्रांवर महाराष्ट्रातील रसिकांनी प्रेम केले. कालांतराने आचार्य प्र.के. अत्रे यांनी याच नाटकाचे विडंबन करत एकच प्याला लिहिले. प्रायोगिक मंचावर याचे सादरीकरण झाले. आता व्यावसायिक मंचावर याचे सादरीकरण होणार आहे. सतीश पुळेकर हे याचे दिग्दर्शन करत असून, यात सुधाकराच्या भूमिकेत सुशांत शेलार काम करत आहे. याचा पहिला प्रयोग पुण्यात होणार आहे. 

या नाटकाची तालीम सध्या मुंबई येथे सुरू आहे. याची माहिती देताना अभिनेता सुशांत शेलार म्हणाले, अत्रे यांनी कमालीच्या पद्धतीने एकच प्याला या नाटकावर विडंबन लिहिले आहे. या निमित्ताने सतीश पुळेकर जवळपास 12 वर्षांनी पुन्हा दिग्दर्शनात उतरले आहेत. यानिमित्ताने अशी एक भूमिका साकारायला मिळणे ही खरेच आनंदाची गोष्ट आहे. 

या नाटकात रामलालची भूमिका साकारत आहेत, स्वप्नील राजशेखर. या नाटकाबद्दल बोलताना ते म्हणाले, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. पण प्रमाणात कोणतीही गोष्ट केली तर ती चालते. हे त्यांना सांगायचे आहे. या नाटकात रामलाल दारूबंदीबद्दल आग्रही आहे. तर तळीराम हा व्यसनाच्या आहारी गेला आहे. त्याच्यामध्ये सुधाकर अडकला आहे. म्हणजे अतिमद्य प्राशन वाईट आहेच. पण त्यावर सरसकट बंदीही अयोग्य आहे. अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. 

या नाटकाचा पहिला प्रयोग 9 आणि 10 जूनला पुण्यात होणार आहे. 
 
Web Title: drama ekach pyala entertainment esakal news