नाट्यसंमेलनाध्यक्षपदाच्या शर्यतीत कीर्ती शिलेदार, श्रीनिवास भणगे, सुरेश साखवळकर

बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

नाट्यसंमेलनाच्या शर्यतीत यंदा तीन उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत. किर्ती शिलेदार, सुरेश साखवळकर आणि श्रीनिवास भणगे या तीन मान्यवरांनी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरले आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. 28 सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. 

मुंबई : नाट्यसंमेलनाच्या शर्यतीत यंदा तीन उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत. किर्ती शिलेदार, सुरेश साखवळकर आणि श्रीनिवास भणगे या तीन मान्यवरांनी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरले आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. 28 सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. 

परिषदेचे कार्यवाह दीपक करंजीकर यांनी पत्रकाद्वारे ही माहीती दिली आहे. कीर्ती शिलेदार यांना शेवगाव, बारामती व पुणे शाखेतर्फे सूचक अनुमोदक लाभले आहेत. तर सुरेश साखवळकर यांना सातारा व तळेगाव दाभाडे शाखेचे सूचक व अनुमोदक लाभले आहेत. तर श्रीनिवास भणगे यांना पुणे शाखेने अनुमोदन दिले आहे. आता पुढील काही अवधीत हे अर्ज परत घ्यायची मुदत असणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. जो कोणी अध्यक्ष होईल, तो मावळते अध्यक्ष जयंत सावरकर यांच्याकडून हाती सूत्रे घेईल.  

Web Title: drama natyaparisjad esakal news