नाट्यपरिषदेतर्फे नाट्यलेखन कार्यशाळेचे आयोजन

टीम इ सकाळ
रविवार, 18 जून 2017

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जुलै महिन्यापासून सशुल्क नाट्य-लेखन कार्यशाळा घेत आहे. त्यासाठी नवोदित लेखकांनी आपल्याकडील नाट्य-बीज परिषदेकडे १८ जुलै, २०१७ पर्यंत पाठवावीत. त्यातून पहिल्या फेरीसाठी २० लेखकांची निवड होईल,

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जुलै महिन्यापासून सशुल्क नाट्य-लेखन कार्यशाळा घेत आहे. त्यासाठी नवोदित लेखकांनी आपल्याकडील नाट्य-बीज परिषदेकडे १८ जुलै, २०१७ पर्यंत पाठवावीत. त्यातून पहिल्या फेरीसाठी २० लेखकांची निवड होईल,

ज्यांना कार्यशाळेच्या पहिल्या १२ सत्रात सहभागी होता येईल. त्यात त्यांना मराठी रंगभूमीचा इतिहास, प्रवाह, महत्वाचे नाटककार, दिग्दर्शक, निर्माता, नट नाटक कसं निवडतात लेखन भान याविषयी त्या त्या क्षेत्रातील योग्य मान्यवरांच्या मार्गदर्शनात त्यांच्याशी संवाद साधता येईल. पुढे त्यातून ९ लेखक निवडले जातील व त्यांना लेखन-तंत्र, संवाद भाषा याविषयी मार्गदर्शन केले जाईल. मार्गदर्शक म्हणून डॉ. अनिल बांदिवडेकर, वामन तावडे व महेन्द्र तेरेदेसाई असतील.

कार्यशाळेचे शुल्क व अधिक माहिती www.natyaparishad.org@gmail.com या वेबसाईटवर मिळेल किंवा खालील क्रमांकावर संपर्क करा.फोन :- ०२२-२४३००५९४ / २४३७७६४९

Web Title: drama writing workshop esakal news