
‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आता लवकरच आयुषमानचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट हाँगकाँगमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हाँगकाँग : आगळेवेगळे चित्रपट प्रेक्षकांना देण्यास प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुराना नेहमीच सज्ज असतो. अशाच त्याच्या ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आता लवकरच आयुषमानचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट हाँगकाँगमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात आयुषमानसह ‘सोनू के टिटू की स्विटी’ फेम अभिनेत्री नुसरत भरूचा मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात मुलीचा आवाज काढण्यात माहीर असणाऱ्या पुरुषाची कथा दाखवण्यात आली. आता मात्र हा चित्रपट भारताबाहेर म्हणजेच हाँगकाँगमध्ये प्रदर्शित होत असल्याने आयुषमानच्या सर्वच चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब ठरणार आहे.
web title : 'Dream Girl' in Hong Kong