Shriya Saran: श्रिया सरनला नवऱ्याचं चुंबन घेणं पडलं महागात! नेटकरी म्हणाले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drishyam 2 actress Shriya Saran kisses her husband while posing for paps and she get trolled

Shriya Saran: श्रिया सरनला नवऱ्याचं चुंबन घेणं पडलं महागात! नेटकरी म्हणाले..

shriya saran: साऊथ सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रिया सरन अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. ती दररोज तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. सध्या तिच्या 'दृश्यम 2' या चित्रपटामुळे चर्चेत असलेली ही श्रिया आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. श्रेयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यावर नेटिझन्स तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. (Drishyam 2 actress Shriya Saran kisses her husband while posing for paps and she get trolled)

इंस्टाग्राम अकाउंटवर श्रिया आणि तिचा नवरा आंद्रेई कोशेव्ह यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, श्रेया आणि आंद्रेई रोमँटिक मूडमध्ये आहेत इतकेच नाही तर दोघांनीही कॅमेऱ्यासमोर एकमेकांना किस केले, ज्याला पाहून यूजरच्या मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

श्रियाच्या या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, पालक झाल्यानंतरही मॅच्युरिटी आलेली नाही. त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले की, घर कमी पडले का? तर एक युजरने म्हणतो, 'तुम्हाला जे करायचे आहे ते घरी करा, बाहेर काय दाखवता.' तर एकाने अक्षरशः कहरच केला आहे. 'जर तुम्ही फॉरेनर माणसासोबत लग्न केले आहे तर हे होणारच' अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

काही निगीटीव कमेंट करत आहेत आणि काही श्रियाचा क्लास काढत आहेत, तर काही लोकही आहेत ज्यांना या दोघांचा हा रोमँटिक व्हिडिओ आवडला आहे आणि त्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.