'दृश्यम 2'चं शूटिंग सुरू; गोव्यातून सेटवरचा महत्त्वाचा फोटो व्हायरल

अजय देवगणच्या 'दृश्यम' सिनेमाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला होता.
Drishyam 2...coming soon!
Drishyam 2...coming soon!Google

अजय देवगणच्या(Ajay Devgan) 'दृश्यम' सिनेमाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला होता. तसं पाहिलं तर साऊथच्या सिनेमाचा हा रीमेक होता. पण या रीमेकलाही प्रेक्षकांनी उत्स्फुर्त दाद दिली होती. नंतर 'दृश्यम भाग २' दक्षिणेत प्रदर्शित झाल्यानंतर हिंदीत त्याचा रीमेक कधी येतोय याचीच सगळे चाहते चातकासारखी वाट पाहत होते. पण आता याचं उत्तर मिळालं आहे, सिनेमाच्या शूटिंगला गोव्यात सुरुवातही झालीय,आणि सिनेमा संदर्भातली मोठी बातमी सेटवरचा फोटो लीक झाल्यामुळे कळाली आहे.

Drishyam 2...coming soon!
शाहिदच्या 'जर्सी'चे राम गोपाल वर्मानं काढले वाभाडे, म्हणाला....

'दृश्यम २' च्या शूटिंगला तब्बूनं सुरुवात केली आहे,जी यामध्ये म्हत्त्वाच्या भूमिकेत आहे. तब्बूनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरनं यासंदर्भात फोटो शेअर करीत माहिती दिली आहे. अभिनेत्रीनं शेअर केलेल्या या फोटोत सिनेमाचा क्लॅप बोर्ड दिसत आहे. ज्यामध्ये सिनेमाचं नाव आणि सिनेमासंदर्भात महत्त्वाची माहिती लिहिलेली आहे.

Drishyam 2...coming soon!
'KGF 2' नंतर कधी येतोय 'KGF 3'? 'रॉकी भाई' नं दिलीय मोठी हिंट

या फोटोला शेअर करत तब्बून लिहिलं आहे,''पहिला दिवस,दृश्यम २''. सूत्रांच्या माहितीनुसार कळतंय की,तब्बून या सिनेमाचं शूटिंग गोव्यात सुरु केलं आहे. या सिनेमात तिच्यासोबत अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. याबरोबच श्रीया सरन,इशिता दत्त या सिनेमात तिच्यासोबत दिसणार आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित या सिनेमात अजय देवगण विजय साळगावकर ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तब्बू देखील पोलिस अधिकारी साकारणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की 'दृश्यम २' हा १९ फेब्रुवारी,२०२१ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या मल्याळम सिनेमाचा हिंदी रीमेक असणार आहे. मल्याळम सिनेमा 'दृश्यम २' मध्ये साऊथ सुपर स्टार मोहन लाल यानं मुख्य भूमिका केली होती. या सिनेमातील भूमिकेसाठी मोहन लाल याचं खूप कौतूकही करण्यात आलं होतं.

तब्बूचा 'भूलभूलैय्या २' सिनेमाचा ट्रेलरही नुकताच रीलीज करण्यात आला आहे. बोललं जात आहे की तब्बू 'भूलभूलैय्या २' मध्ये अमिषा पटेलनं पहिल्या भागात केलेली व्यक्तिरेखा साकारत आहे. अनीस बझ्मी दिग्दर्शित या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख अनेकदा पुढे ढकलली गेली होती. सुरुवातीला हा सिनेमा २५ मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता,परंतु आता २० मे ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com