'ड्राय डे'च्या कलाकारांनी दिला 'डोन्ट ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा संदेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

31 डिसेंबरच्या सप्ताहातच नव्हे तर 'कधीच दारू पिऊन वाहने चालवू नका' असा समाजहिताय संदेश आगामी 'ड्राय डे' सिनेमाच्या संपूर्ण टीमने नागरिकांना दिला आहे.

ठाणे - आजच्या तरुणाईमध्ये दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण, यांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी देखील कंबर कसली आहे. खासकरून वर्षारंभाच्या सप्ताहात याचे प्रमाण वाढत असल्यामुळे 'दारू पिऊन वाहने चालवू नका' या मोहिमेअंतर्गत अनेक संस्था पोलिसांना सहाय्य करताना दिसून येतात. मात्र केवळ 31 डिसेंबरच्या सप्ताहातच नव्हे तर 'कधीच दारू पिऊन वाहने चालवू नका' असा समाजहिताय संदेश आगामी 'ड्राय डे' सिनेमाच्या संपूर्ण टीमने नागरिकांना दिला आहे.

dry day

dry day

dry day

dry day

​ठाणे येथील तीन हात नाका येथे नुकत्याच राबविण्यात आलेल्या 'डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह' मोहिमेमध्ये, ऋत्विक केंद्रे, चिन्मय कांबळी, कैलाश वाघमारे, मोनालिसा बागल आणि आयली घिए या सिनेमाच्या कलाकारांनी वाहतूक पोलिसांसोबत 'डोन्ट ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा संदेश असलेले ग्रीटींग्स आणि गुलाबाची फुले वाहन चालकांना वाटली. तसेच वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या चालकांना शुभेच्छापत्र देखील दिली.

dry day

dry day

या मोहिमेला वाहतूक पोलिस आणि रहिवाशांचा देखील भरघोस प्रतिसाद लाभला. दारू पिऊन वाहन चालवल्याने जीवितहानी होण्याची अधिक शक्यता असते तेव्हा वाहन चालवताना 'ड्राय डे' पाळा, असा उपदेश सिनेमाचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनी लोकांना दिला आहे. आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत हा सिनेमा येत्या 13 जुलैला प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक पांडुरंग जाधव लिखित तसेच नितीन दीक्षित संवाद व पटकथा लिखित 'ड्राय डे' या सिनेमामध्ये आजच्या तरुण पिढीचे भावविश्व दाखविण्यात आले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dry day movie cast gives a message of dont drink and drive