दुहेरी मालिकेमध्ये परतलेली मैथिली आहे की सोनिया?

टीम ई सकाळ
मंगळवार, 18 जुलै 2017

स्टार प्रवाहच्या लोकप्रिय 'दुहेरी' या मालिकेच्या कथानकानं वेगळंच वळण घेतलं आहे. मैथिलीचा खून झाल्यानंतर अल्पावधीतच तिच्यासारखीच दिसणारी मुलगी सूर्यवंशी कुटुंबात आली आहे. ती स्वत:ला सोनिया कारखानीस असल्याचं सांगत असली, तरी ती खरी कोण आहे, यावर सूर्यवंशी कुटुंबाचा विश्वास बसलेला नाही

मुंबई : स्टार प्रवाहच्या लोकप्रिय 'दुहेरी' या मालिकेच्या कथानकानं वेगळंच वळण घेतलं आहे. मैथिलीचा खून झाल्यानंतर अल्पावधीतच तिच्यासारखीच दिसणारी मुलगी सूर्यवंशी कुटुंबात आली आहे. ती स्वत:ला सोनिया कारखानीस असल्याचं सांगत असली, तरी ती खरी कोण आहे, यावर सूर्यवंशी कुटुंबाचा विश्वास बसलेला नाही.
 
बल्लाळ आणि परसूचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी धडपडणाऱ्या मैथिलीला परसूनं संपवलं. खूनानंतर त्यानं तिला लगेच गाडूनही टाकलं. मैथिली गेल्याची बातमी सूर्यवंशी कुटुंबाला कळल्यानंतर त्यांना धक्का बसला. हा धक्का पचवताना तेराव्या दिवशीच मैथिली सारखीच दिसणारी मुलगी घरात दाखल झाली. आता ही नेमकी कोण, मैथिली की सोनिया असा संभ्रम निर्माण झाला. मात्र, तिनं आपण  सोनिया कारखानीस असल्याचे पुरावेही दिले. मात्र, नेहाला तिचं म्हणणं अजिबात पटलेलं नाही. तिच्या वागण्या-बोलण्यातून ती मैथिली असल्याची नेहाची भावना आहे.
 
 

Web Title: Duheri serial new turn esakal news

टॅग्स