'लॉकडाऊनमध्ये बायकोला आनंदी कसे ठेवाल?'

वृत्तसंस्था
बुधवार, 25 मार्च 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत देशात संपूर्ण लॉकडाऊन असल्याची घोषणा केली. संपूर्ण देश घरात बसला असून, यामध्ये बॉलिवूडमधील अभिनेते, अभिनेत्रींचा समावेश आहे.

मुंबईः  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत देशात संपूर्ण लॉकडाऊन असल्याची घोषणा केली. संपूर्ण देश घरात बसला असून, यामध्ये बॉलिवूडमधील अभिनेते, अभिनेत्रींचा समावेश आहे.

पंतप्रधानांच्या घोषणेनंतर अभिनेता शाहिद कपूरनेही आपल्या चाहत्यांना घरात सुरक्षित राहण्याचे ट्विटरवरून आवाहन केले. पण, एका चाहत्याने शाहिदला एक मजेशीर प्रश्न विचारला. चाहता म्हणाला, 'होय, 21 दिवसांच्या लॉक डाऊनमध्ये बायकोला आनंदी कसे ठेवायचे?' या प्रश्नावर शाहिदनेही तेवढेच मजेशीर उत्तर दिले आहे. शाहिद म्हणाला, 'आदरपूर्वक सेवा करो... बॉस बॉस होता है...'

दरम्यान, शाहिद कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात आहे. काही दिवसांपूर्वी शाहिदने पत्नी मीरा राजपूतसोबत घरात वर्कआऊट करत असतानाचे छायाचित्र शेअर केले होते. त्याचा आगामी चित्रपच 'जर्सी' आहे. पण, कोरोनामुळे चित्रपटाचे शुटींग थांबले आहे. यापूर्वी त्याचा कबीर सिंग हा चित्रपट हिट झाला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणीने भूमिका साकारली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: during 21 day lockdown in India says Shahid Kapoor on twitter