
लॉकडाऊनमुळे अनेक अशी कुटुंब आहेत जी दररोज जगण्यासाठी संघर्ष करत आहेत..अशातंच सिनेनिर्माता-दिग्दर्शक करण जोहरने या संकटकाळात त्याच्या असंवेदनशील पोस्टसाठी सगळ्यांची माफी मागितली आहे..
मुंबई- कोरोना व्हायरसमुळे सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र हा लॉकडाऊन सगळ्यांसाठी सारखा नाहीये. या लॉकडाऊनमध्ये काही जण कुटुंबासोबत मजा मस्ती करत वेळ घालवत आहे तर काही कुटुंब एकवेळच्या जेवणासाठी देखील संघर्ष करत आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक अशी कुटुंब आहेत जी दररोज जगण्यासाठी संघर्ष करत आहेत..अशातंच सिनेनिर्माता-दिग्दर्शक करण जोहरने या संकटकाळात त्याच्या असंवेदनशील पोस्टसाठी सगळ्यांची माफी मागितली आहे..
करण जोहरने त्याच्या ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये काही मोठ्या व्यक्ती या काळात मजा मस्ती करत आहेत, एन्जॉय करत आहेत तिकडेच सामान्स माणूस त्याच्या परिस्थितीने हैराण आहे. करणने ट्वीटटवर थँक यू सेलिब्रिटीज नावाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की एलन डिजेनर्स, सैम आर्मिटेज आणि अमांडा केलर यांसारखे सेलिब्रिटी घरात राहून क्वारंटाईन अगदी सुट्टी असल्यासारखा घालवत आहेत, एन्जॉय करत आहेत तर दुसरीकडे सामान्य माणसांना या महारोगराई दरम्यान जगण्यासाठी प्रत्येक क्षणाला संघर्ष करावा लागत आहे.
करणने हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं आहे की, ''यामुळे मला दुःख झालं आहे आणि मला हे जाणवलं आहे की माझ्या कित्येक पोस्ट असंवेदनशील असू शकतात. मी मनापासून माफी मागतो आणि हे सांगू इच्छितो की मी हे हेतूपुर्वक केलेलं नाही. माझ्यात कदातिच दूरदृष्टीची कमतरता असेल. मला याचं दुःख आहे.''
This hit me hard and I have realised many of my posts may have been insensitive to many...I apologise profusely and wish to add none of it was intentional and came from a place of sharing but clearly may have lacked emotional foresight ....am sorry! https://t.co/MO3kHkDQdo
— Karan Johar (@karanjohar) April 25, 2020
करण या लॉकडाऊन दरम्यान त्याच्या चाहत्यांसाठी रुही आणि यश या त्याच्या मुलांचे मजेदार व्हिडिओ पोस्ट करत प्रेक्षकांचं मनोरंजन करायचा. मात्र करणच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी त्याचं समर्थनंच केलंय.. एका नेटक-याने लिहिलंय, ''या कठीण काळात तुमची मुलं ऐंजल आहेत, मी आणि माझी मुलगी यश आणि रुहीच्या व्हिडिओंची वाट पाहत असतो.'' तर दुस-या एका युजरने, ''तुम्ही माफी का मागत आहात? तुमच्या व्हिडिओमध्ये मुलांचा निरागसपणा असतो आणि आमच्यासारख्यांना ते आनंद देतात, मी शिकागोमध्ये एक आरोग्य कर्मचारी आहे आणि तुम्हाला सांगतोय की, तुम्ही दिखावा करणा-या सेलिब्रिटींपैकी नाही आहात, तेव्हा माफी मागू नका. पोस्ट करत रहा आणि आनंद वाटत राहा.''
तर एका नेटक-याने त्याच्या संवेदशीलतेचं कौतुक करत लिहिलंय, ''सॉरी बोलायला खूप हिंमत लागते, मला नाही माहित की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी माफी मागत आहात पण तुमची संवेदनशीलता पाहून खूप बरं वाटलं.''
during the lockdown filmmaker karan johar had to apologize for this