ek ladki ko dekha to aisa laga movie online leaked
ek ladki ko dekha to aisa laga movie online leaked

'एक लडकी...' ऑनलाइन लीक !

'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हा बॉलिवूडपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. पण एका वेबसाईटने हा चित्रपट ऑनलाइन लीक केला आहे.

'तामिल रॉकर्स' असे या वेबसाईटचे नाव आहे. या वेबसाईटने हिंदी आणि तमिळ चित्रपट यापुर्वीही लीक केले आहेत. ज्यात काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झालेल्या द अॅक्सीडेंल प्राइम मिनिस्टर आणि मणिकर्णिका या चित्रपटांचाही समावेश होता. या प्रकारांमुळे चित्रपटांच्या व्यवसायावर परिणाम होतो. 

'तामिल रॉकर्स' च्या विरोधात अनेक वेळा तक्रार केल्या गेली आहे. तरीही हा प्रकार सुरुच आहे. पायरसी च्या प्रकरणांमध्ये चर्चा असलेल्या या वेबसाइटने ठग्स ऑफ हिंदोस्तान, सरकार या चित्रपटांना सुध्दा लीक केले होते. 

सोनम कपूर, राजकुमार राव, अनिल कपूर आणि जूही चावला यांसारखी तगडी स्टारकास्ट असूनही ही चित्रपट पाहिजे तसा व्यवसाय करु शकलेला नाही. पस्तीस करोड रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवशी केवळ तीन करोडचा व्यवसाय करु शकला. दुसऱ्या दिवशी सुध्दा केवळ पाच करोडच्या आतच व्यवसाय झाला. अशातच चित्रपट लीक झाला म्हटल्यावर या चित्रपट व्यवसायासमोरची अडचण आणखीच वाढली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com