'एक व्हिलन 2' ची टीम तय्यार, 'या' अभिनेत्रीला मिळाली संधी..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 March 2020

2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या मोहित सूरी दिग्दर्शित 'एक व्हिलन' या सिनेमाच्या सिक्वेलची सगळ्यांना उत्सुकता आहे..या सिनेमात कोणती स्टारकास्ट असेल याबाबत अनेक चर्चा रंगतायेत.

2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या मोहित सूरी दिग्दर्शित 'एक व्हिलन' या सिनेमाच्या सिक्वेलची सगळ्यांना उत्सुकता आहे..या सिनेमात कोणती स्टारकास्ट असेल याबाबत अनेक चर्चा रंगतायेत..मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार या सिनेमाची स्टारकास्ट आता फायनल झाली आहे..

पूनम  पांडेचे हे फोटो तुम्ही कधीही पाहिले नसतील...

'एक व्हिलन 2' मध्ये मुख्य भूमिकेत जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि आदित्य रॉय कपूर यांची निवड सगळ्यात आधी मोहितने केली आहे..तसंच आदित्य सोबत जोडी म्हणून अभिनेत्री तारा सुतारियाला निवडलंय..

Image result for ek villain 2

'एक व्हिलन 2' मध्ये ताराची एन्ट्री होण्यासोबतच मोहितची टीम पूर्णपणे तयार झालीये...या वर्षाच्या मध्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल असं कळतंय..तारा ही गायिका असल्याने या सिनेमात देखील ती एक गायिकेच्या भूमिकेत दिसून येईल...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Snug as a bug in a rug! @rahuljhangiani @marcepedrozo

A post shared by TARA (@tarasutaria) on

या सिनेमासाठी ताराची निवड करण्यावरून मोहित सांगतो की,खरं तर दिग्दर्शकासाठी एका गितकाराला कलाकाराच्या रुपात सादर करणं खूप आव्हानात्मक असतं..पण तारा स्वतः गायिका असल्याने ती या भूमिकेसाठी योग्य असून माझासाठी देखील ते सोपं होईल असं मोहित सांगतो...

हा सिनेमा पुढच्या वर्षी 8 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असून खलनायकांवर सिनेमा करण्याचा मोहितचा हा प्रयत्न असाच पुढे चालू राहणार असल्याचं कळतंय...

ek villain 2 directed by mohit suri now tara sutaria join starcast


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ek villain 2 directed by mohit suri now tara sutaria join starcast