एकता कपूरची तेजस्वीच्या प्रकरणावर प्रतिक्रिया, माझ्याकडे...

भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रेटी एकता कपूर (Ekta Kapoor) तिच्या परखड स्वभावासाठी ओळखली जाते.
ekta Kapoor
ekta Kapoor

Entertainment News: भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रेटी एकता कपूर (Ekta Kapoor) तिच्या परखड स्वभावासाठी ओळखली जाते. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ तिनं भारतीय टेलिव्हिजन क्षेत्राला महत्वाचे योगदान दिले आहे. त्यासाठी तिला देशातील मानाच्या पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे. एकताला सोशल मीडियावर (Social media news) वेगवेगळ्या कारणासाठी नेटकऱ्यांचा सामना करावा लागला आहे. त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे यंदाच्या बिग बॉसच्या 15 (Bigg Boss 15) व्या सीझनमध्ये विजेती झालेली तेजस्वी प्रकाश. (Tejaswi prakash) तिचं जिंकणं यामागे व्यावसायिक असल्याची टीका तिच्यावर झाली होती. मात्र यामागे एकता कपूरचाही सहभाग असल्याची चर्चा होती.

यासगळ्या प्रकऱणावर एकता कपूरनं (Ekta Kapoor Reaction) आपली प्रतिक्रिया दिली आहे. तेजस्वीला नागिन 6 मध्ये महत्वाची भूमिका मिळाली आहे. तिला नागिनमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या तेजस्वीला ही भूमिका एकता कपूरमुळे मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. तेजस्वी एकीकडे तिच्या विजयाचा आनंद साजरा करत असताना तिच्यावर एकता कपूरमुळे टीकाही झाली होती.

ekta Kapoor
Viral Video : महिलांची अंधश्रद्धा; चारचौघात खाताहेत चाबकाचे फटके

यावेळी एकता कपूरनं तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिनं आपल्यावरील सगळ्या आरोपांचे खंडन केले आहे. आपल्याविषयी सध्या सोशल मीडियावर जे काही बोललं किंवा लिहिलं जात आहे. ते चूकीचे असल्याचे तिनं सांगितलं आहे. आपल्यामुळे तेजस्वीला बिग बॉसचं विजेतेपद मिळालेलं नाही. मी काही एवढी पॉवरफुल नाही. जेणेकरुन माझ्या शब्दावर तिला बिग बॉसचं विजेतेपद मिळेल. त्यामुळे जे कोणी माझ्यावर टीका करत आहे त्यांनी विचार करुन बोलावे. असंही एकतानं बोललं आहे. एखाद्या चॅनलचा विचार करुन कुणाला जिंकून देणं असा आरोप हास्यापद असल्याची प्रतिक्रियाही तिनं दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com