Elon Musk Angry: रॅपरनं 'नाझी स्वस्तिक'चा फोटो टाकला, ट्विटरचे मालक संतापले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elon Musk Angry

Elon Musk Angry: रॅपरनं 'नाझी स्वस्तिक'चा फोटो टाकला, ट्विटरचे मालक संतापले!

Elon Musk says Kanye West's Twitter account suspended: ट्विटरचे मालक इलॉन मस्क हे गेल्या काही दिवसांपासून भलतेच संतापलेले दिसत आहे. ते जेव्हापासून ट्विटरचे मालक झाले तेव्हापासून सतत अॅक्शन मोडमध्ये आहेत. आल्या आल्या त्यांनी सीइओची हाकलपट्टी केली. त्यानंतर देशभरातील ट्विटरच्या कार्यालयातील महत्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींना त्यांनी राजीनामा देण्यास भाग पाडले आहे.

आता मस्क हे एका वेगळयाच कारणामुळे चर्चेत आले आहे. त्यांनी प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्टला ट्विटरवरुन काढून टाकले आहे. त्याचे अकाउंट सस्पेंड केले आहे. त्यामुळे कान्येच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे. कान्येनं सोशल मीडियावर स्वस्तिकचा फोटो टाकला होता. तो मस्क यांना खटकल्यानं त्यांनी थेट कान्येचे अकाउंटच सस्पेंड केले आहे. कान्येनं ट्विटरच्या पॉलिसीचे उल्लंघन केल्याचा आरोप ट्विटरच्या वतीनं करण्यात आला आहे.

हेही वाचा - आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

Elon Musk Angry

Elon Musk Angry

एक दोन वेळा नव्हे तर २२ वेळा ग्रॅमी पुरस्कारावर आपली मोहोर उमटविणाऱ्या कान्येवर केलेली कारवाई धक्कादायक असल्याचे म्हटले जात आहे. मी माझ्या पद्धतीनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानं पुन्हा एकदा ट्विटरच्या पॉलिसीचे उल्लंघन केले आहे. अखेर त्याचे अकाउंट आम्हाला सस्पेंड करावे लागले आहे. त्याचे वागणे आणि त्यानं केलेली कृती ही काही समर्थन करण्यासारखी नक्कीच नव्हती. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावा लागल्याचे मस्कनं म्हटले आहे.

प्रेझ द गॉडचा प्रसिद्ध रॅपर कान्येवर झालेली कारवाई ही चर्चेत आली आहे. त्याच्या असंख्य चाहत्यांनी याप्रकरणी मस्कवर नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटरचा मालक झाल्यापासून त्याचा अतिरेक वाढत चालला आहे. असा आरोप नेटकऱ्यांनी सुरु केला आहे.