कोमोलिकाच्या रूपात आता आमना शरीफ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

आमना शरीफ या अभिनेत्रीवर कोमोलिका उभी करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. या व्यक्तिरेखेची खलनायिकापण तितक्‍याच जोमाने साकार करण्यास तिने कोणतीही कसर शिल्लक न ठेवण्याचा निश्‍चय केला आहे.

टीव्ही मालिकांची सम्राज्ञी एकता कपूरनेही कोमोलिकाच्या रूपाने एका अजरामर खलनायिकेची भर टाकली आहे. प्रेरणा आणि अनुराग यांच्या जीवनात विष कालविण्यासाठी कट कारस्थाने रचणाऱ्या कोमोलिका या खलनायिकेचा तिरस्कार करण्यास प्रेक्षकांना खूप आवडते.

अभिनेत्री उर्वशी ढोलकियाने सर्वप्रथम कोमोलिकाची व्यक्तिरेखा साकारून तिच्यातील खलप्रवृत्तीचे दर्शन प्रेक्षकांना घडविले होते. पुढे काही वर्षांच्या खंडानंतर कसौटी जिंदगी की ही मालिका नव्या संचात प्रसारित झाली, तेव्हा हीना खान हिने ही भूमिका साकारून तिला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते. आता आमना शरीफ या अभिनेत्रीवर कोमोलिका उभी करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. या व्यक्तिरेखेची खलनायिकापण तितक्‍याच जोमाने साकार करण्यास तिने कोणतीही कसर शिल्लक न ठेवण्याचा निश्‍चय केला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

एकता कपूरलाही आमनाने साकारलेली कोमोलिकाची भूमिका आवडली असून त्याबद्दल ती म्हणाली, ‘‘आमना आता कोमोलिकाच्या व्यक्तिरेखेत व्यवस्थित रुळली आहे. कोमोलिका ही खलनायिकेची भूमिका रंगविणं तितकं सोपं नाही, पण आमनाने ही भूमिका अशी उभी केली आहे की जणू तिचा जन्मच या भूमिकेसाठी झाला आहे.’’

Bala Review : विनोदी तरीही महत्तवपूर्ण संदेश देणारा चित्रपट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Entertainment artilce Amna Sharif

टॅग्स
टॉपिकस