भूषण प्रधान व पल्लवी पाटील एकत्र 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

मुंबई - अभिनेता भूषण प्रधान व अभिनेत्री पल्लवी पाटील हे दोघे "तू तिथे असावे' या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. नात्यांची सुरेख सांगड घालत प्रेमाचा, विश्वासाचा, जगण्याचा अर्थ उलगडून दाखवणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जी कुमार पाटील एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील व दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत. नुकताच चित्रपटाचा मुहूर्त झाला. 

आयुष्यात कधी कोणत्या अडथळ्यांना सामोरे जावे लागेल हे सांगता येत नाही. अशा वेळी हताश न होता आयुष्य कसे जगावे, यावर "तू तिथे असावे' हा चित्रपट भाष्य करतो. चित्रपटाची कथा आशीष-दीपक यांची आहे. संगीत दिनेश अर्जुना तर छायांकन बाशालाल सय्यद यांचे आहे. चित्रपटाचे सहनिर्माते आकाश कांडूरवार, प्रशांत ढोमणे, शरद शर्मा असून, कार्यकारी निर्माते रोहितोष सरदारे आहेत. भूषण व पल्लवी पाटील यांच्यासोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, सुनील तावडे, मास्टर तेजस पाटील हे कलाकार या चित्रपटात आहेत. 

Web Title: entertainment bhushan pradhan Pallavi Patil