जबाबदार मुलगी दीपिका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

बॉलीवूडची मस्तानी गर्ल दीपिका पदुकोणने आपल्या अभिनयकौशल्यानं सर्वांना आपलंसं केलं आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटात तिचा नवीन अंदाज पाहायला मिळतो; पण खऱ्या आयुष्यातही दीपिका नेहमी असं काही करते जे ऐकून प्रत्येक जण थक्क होऊन जातो. ९ जूनला तिचे वडील प्रकाश पदुकोण यांचा ६२ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी दीपिका बंगळुरुला आली आणि आपल्या कुटुंबासमवेत रमली. त्यानंतर तिने आणखीन चार दिवसांची सुट्टी मागितली. तिचे आई-वडील दुसऱ्या घरी शिफ्टिंग करीत होते. दीपिकाने जबाबदार मोठ्या मुलीचे कर्तव्य बजावत शिफ्टिंगसाठी मदत करण्यासाठी सुट्टी वाढवून घेतली. इतकंच नाही; तर नवीन घर पूर्णपणे सेट होईपर्यंत ती थांबली.

बॉलीवूडची मस्तानी गर्ल दीपिका पदुकोणने आपल्या अभिनयकौशल्यानं सर्वांना आपलंसं केलं आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटात तिचा नवीन अंदाज पाहायला मिळतो; पण खऱ्या आयुष्यातही दीपिका नेहमी असं काही करते जे ऐकून प्रत्येक जण थक्क होऊन जातो. ९ जूनला तिचे वडील प्रकाश पदुकोण यांचा ६२ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी दीपिका बंगळुरुला आली आणि आपल्या कुटुंबासमवेत रमली. त्यानंतर तिने आणखीन चार दिवसांची सुट्टी मागितली. तिचे आई-वडील दुसऱ्या घरी शिफ्टिंग करीत होते. दीपिकाने जबाबदार मोठ्या मुलीचे कर्तव्य बजावत शिफ्टिंगसाठी मदत करण्यासाठी सुट्टी वाढवून घेतली. इतकंच नाही; तर नवीन घर पूर्णपणे सेट होईपर्यंत ती थांबली. त्यानंतर ती कामावर रुजू होण्यासाठी मुंबईत परतली. सूत्रांच्या माहितीनुसार विमानातून उतरल्यानंतर दीपिका सरळ संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सेटवर गेली. एक जबाबदार मुलीची भूमिका पार पाडल्यानंतर सहजतेने दीपिका राणीच्या भूमिकेत शिरली.

Web Title: entertainment dipika padukone