हृतिकचा नकार टायगरच्या पथ्यावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

बॉलीवूडचा डान्सिंग स्टार हृतिक रोशन चित्रपटांची निवड विचारपूर्वक करतो. टुकार सिनेमा तो साईन करीतच नाही. स्क्रिप्टमध्ये दम असेल तर त्यासाठी डेटस्‌ ॲडजस्ट करण्याचीही त्याची तयारी असते; पण मध्यंतरी त्याने हॉलीवूड सुपरस्टार सिल्वेस्टर स्टेलॉनचा सुपरहिट चित्रपट ‘रॅम्बो’च्या हिंदी रिमेकमध्ये काम करण्यास नकार दिला अन्‌ त्याची चर्चा रंगली. हृतिक ‘रॅम्बो’च्या रोलसाठी परफेक्‍ट मॅच आहे. तरीही त्याने नकार दिल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हृतिकचा नकार टायगर श्रॉफच्या पथ्यावर पडलाय. ‘रॅम्बो’च्या रोलसाठी त्याची निवड झालीय. ‘रॅम्बो’ची निर्मिती सिद्धार्थ आनंद करत आहेत.

बॉलीवूडचा डान्सिंग स्टार हृतिक रोशन चित्रपटांची निवड विचारपूर्वक करतो. टुकार सिनेमा तो साईन करीतच नाही. स्क्रिप्टमध्ये दम असेल तर त्यासाठी डेटस्‌ ॲडजस्ट करण्याचीही त्याची तयारी असते; पण मध्यंतरी त्याने हॉलीवूड सुपरस्टार सिल्वेस्टर स्टेलॉनचा सुपरहिट चित्रपट ‘रॅम्बो’च्या हिंदी रिमेकमध्ये काम करण्यास नकार दिला अन्‌ त्याची चर्चा रंगली. हृतिक ‘रॅम्बो’च्या रोलसाठी परफेक्‍ट मॅच आहे. तरीही त्याने नकार दिल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हृतिकचा नकार टायगर श्रॉफच्या पथ्यावर पडलाय. ‘रॅम्बो’च्या रोलसाठी त्याची निवड झालीय. ‘रॅम्बो’ची निर्मिती सिद्धार्थ आनंद करत आहेत. त्यांनी हृतिकबरोबर ‘बॅंग बॅंग’ चित्रपटात काम केलंय. ‘रॅम्बो’च्या रिमेकमध्येही हृतिकने काम करावं, अशी त्यांची इच्छा होती; पण त्याने नकार दिला. हृतिकचं म्हणणं होतं की, त्याने अशा प्रकारचे स्टंट ‘बॅंग बॅंग’ चित्रपटात केलेले आहेत. म्हणून त्याने ‘रॅम्बो’मध्ये फारसा इंटरेस्ट दाखवला नाही. आता टायगरने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली असून, त्याच्या पोस्टरचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. विशेष पोस्टर सिल्वेस्टर स्टेलॉनलाही ते पोस्टर आवडलंय.

Web Title: entertainment hrithik roshan