मी आणि खुशीने आई गमावली, तर पप्पांनी जीव!: जान्हवी कपूर

वृत्तसंस्था
शनिवार, 3 मार्च 2018

मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की आपल्या आई-वडीलांवर खूप प्रेम करा. माझ्या आईचेही माझ्यावर खूप प्रेम होते. तिच्या आत्म्याला शांती लाभो. माझ्या आयुष्यात तिला आणि पप्पांना मोठे स्थान होते. ती सतत आम्हा दोघींवर प्रेम करायची.

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी जान्हवीने पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की मी आणि खुशीने आई गमावली, तर पप्पांनी आपला जीवच गमावला आहे.

श्रीदेवी यांच्या दुबईमध्ये बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडसह देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जान्हवीने आईच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले आहे. जान्हवीने इन्टाग्रामवर कुटुंबीयाचे फोटो प्रसिद्ध करत पत्र लिहिले आहे.

जान्हवीने लिहिले आहे, की मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की आपल्या आई-वडीलांवर खूप प्रेम करा. माझ्या आईचेही माझ्यावर खूप प्रेम होते. तिच्या आत्म्याला शांती लाभो. माझ्या आयुष्यात तिला आणि पप्पांना मोठे स्थान होते. ती सतत आम्हा दोघींवर प्रेम करायची. आम्ही आमची आई गमावली आहे. पण, पप्पांनी त्यांचा जीवच गमावला आहे. ती त्यांच्या आयुष्यात पत्नीसह खूप काही होती. गेल्या काही दिवसांत आमच्यासोबत असलेल्या सर्वांचे मी आभार मानते.

Web Title: entertainment news Janhvi kapoor statement on sridevi