सर्वाधिक कमाईच्या यादीत 'टायगर' सलमान टॉपला!

शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

एकोणतिस वर्षे वयाच्या विराट कोहलीला स्पर्धा कोणाची आहे? 

बस्तीस वर्षे वयाच्या रणवीर सिंगला स्पर्धा कोणाची आहे?

पस्तीस वर्षे वयाच्या प्रियांका चोप्राच्या सौंदर्याला स्पर्धा कोणाची आहे...?

तिन्ही प्रश्नांचे उत्तर एकच आहे. 'टायगर' सलमान खान. त्याचे वय आहे 51 वर्षे. 

फोर्ब्ज इंडियाने घोषित केलेल्या भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱया सेलिब्रिटींच्या यादीत सलमानने सलग दुसऱया वर्षी टॉप क्रमांक पटकावला आहे. 

फोर्ब्जने यावर्षी कमाई मोजण्याच्या पद्धतीत बदल केला. मात्र, तरीही तरीही सलमान खान अव्वल स्थानी राहिला. 'ट्युबलाईट'ने बॉक्स ऑफिसवर फारसा धंदा केला नसतानाही जाहिरातींच्या बळावर सलमानने सर्वाधिक उत्पन्न मिळविणाऱया सेलिब्रिटींच्या यादीत आपले स्थान कायम राखले. त्याची वार्षिक कमाई आहे तब्बल 232.83 कोटी रूपये. त्याच्या कमाईत यावर्षी 8.67 टक्क्यांनी वाढ झालीय. सलमानची एकूण कमाई आहे तब्बल 2,683 कोटी रूपये. 

सर्वाधिक उत्पन्न मिळविणारे सेलिब्रिटीः

सर्वाधिक कमाई मिळविणारे फोर्ब्ज इंडियाच्या यादीतील सेलिब्रिटी
क्रमांक     नाव         उत्पन्न    (कोटी रुपये) वय
1 सलमान खान   232.83     51
2 शाहरूख खान   170.50     52
3 विराट कोहली 100.72     29
4 अक्षय कुमार 98.25     50
5 सचिन तेंडूलकर  82.50     44
6 अमीर खान  68.75     52
7 प्रियांका चोप्रा  68     35
8 महेंद्रसिंह धोनी  63.77     36
9 ऋतिक रोशन 63.12     43
10 रणवीर सिंग 62.63     32

Web Title: Entertainment news in Marathi Salman Khan tops in Forbes List