प्रीतीला आले टेन्शन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या ‘इनसाइड एज’ या वेब सिरीजची घोषणा करण्यात आली, तेव्हा बॉलीवूडची बबली गर्ल प्रीती झिंटा टेन्शनमध्ये आली. कारण ही वेब सिरीज आहे, आयपीएल मॅचवर आधारित. रिचा चढ्‌डा या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहे. या वेब सिरीजमध्ये सेलिब्रिटी क्रिकेट टीमच्या अशा एका मालकिणीची ती भूमिका करत आहे, जिच्या अफेअर्सची सगळीकडे चर्चा असते. ही वेब सिरीज किंग्ज इलेव्हन पंजाब या टीमची मालकीण असणाऱ्या अभिनेत्री प्रीती झिंटावर आधारित आहे, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे या वेब सिरीजमध्ये फरहान नेमके काय दाखवणार? याचे प्रीतीला टेन्शन आले होते.

फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या ‘इनसाइड एज’ या वेब सिरीजची घोषणा करण्यात आली, तेव्हा बॉलीवूडची बबली गर्ल प्रीती झिंटा टेन्शनमध्ये आली. कारण ही वेब सिरीज आहे, आयपीएल मॅचवर आधारित. रिचा चढ्‌डा या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहे. या वेब सिरीजमध्ये सेलिब्रिटी क्रिकेट टीमच्या अशा एका मालकिणीची ती भूमिका करत आहे, जिच्या अफेअर्सची सगळीकडे चर्चा असते. ही वेब सिरीज किंग्ज इलेव्हन पंजाब या टीमची मालकीण असणाऱ्या अभिनेत्री प्रीती झिंटावर आधारित आहे, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे या वेब सिरीजमध्ये फरहान नेमके काय दाखवणार? याचे प्रीतीला टेन्शन आले होते. प्रीतीने फरहानला या वेब सिरीजचा पहिला कट दाखविण्याचीही विनंती केली होती; पण रिचाने या सगळ्यावर पडदा टाकत सांगितले की, ‘मला माहीत नव्हते की, प्रीतीने स्क्रीनिंगसाठी विचारले आहे. प्रीती, फरहान आणि रितेश सिधवानी यांची मैत्री ‘दिल चाहता है’ या चित्रपटापासूनची आहे. मला नाही वाटत की प्रीतीवर आधारित काही या वेब सिरीजमध्ये आहे. ती ही वेब सिरीज बघेल तेव्हा तिलाही ती आवडेल, असे मला वाटते. १० जुलैला या वेब सिरीजचे १० एपिसोड प्रदर्शित केले जातील.

Web Title: entertainment priti zinta in tension