शाहरूखची पंचविशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

बडे बडे देशोंमे ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है... असे सहजपणे ‘डीडीएलजे’ मध्ये काजोलला म्हणणाऱ्या शाहरूख खानच्या अभिनय क्षेत्रातील करियरला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याने ट्विटरवरून हे जाहीर केले. त्याचा पहिला चित्रपट ‘दिवाना’ बरोब्बर २५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. दिल्लीच्या शाहरूखने वडील गेल्यानंतर आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई गाठले. त्याच्या आईने त्याला त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण घेतले. मुंबईत आल्यानंतर तो अक्षरशः स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर राहिला. त्यानंतरही त्याने प्रयत्न सोडले नाहीत.

बडे बडे देशोंमे ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है... असे सहजपणे ‘डीडीएलजे’ मध्ये काजोलला म्हणणाऱ्या शाहरूख खानच्या अभिनय क्षेत्रातील करियरला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याने ट्विटरवरून हे जाहीर केले. त्याचा पहिला चित्रपट ‘दिवाना’ बरोब्बर २५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. दिल्लीच्या शाहरूखने वडील गेल्यानंतर आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई गाठले. त्याच्या आईने त्याला त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण घेतले. मुंबईत आल्यानंतर तो अक्षरशः स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर राहिला. त्यानंतरही त्याने प्रयत्न सोडले नाहीत. त्याने ऑडिशन्स दिल्या आणि टीव्हीवर पहिल्यांदा दिसला तो ‘फौजी’ या दूरदर्शनवरील मालिकेतून. त्यानंतर ‘सर्कस’ आणि इतर अनेक मालिकांमध्ये त्याने काम करायला सुरुवात केली; पण त्याची ‘मन्नत’ वेगळीच होती. त्याचा पहिला चित्रपट ‘दिवाना’ जरी असला, तरी ‘दिल है आशना’ या चित्रपटासाठी तो दिव्या भारतीबरोबर पहिल्यांदा हिरो बनला होता; पण काही कारणाने या चित्रपटाचे चित्रीकरण काहीसे लांबले आणि ‘दिवाना’ हा त्याचा चित्रपट आधी प्रदर्शित झाला. 

त्यानंतर त्याची एकामागून एक ब्लॉकबस्टर चित्रपटांची रांगच लागली. फक्त हिरोच नाही तर व्हिलन बनूनही त्याने चाहत्यांची मने जिंकली. 
 ‘चक दे इंडिया’, ‘फॅन’, ‘रा.वन’, ‘माय नेम इज खान’, ‘जब तक है जान’, ‘डियर जिंदगी’, ‘रईस’ अशा वेगळ्या धाटणीचे चित्रपटही त्याने केले. त्याच्या २५ वर्षांच्या या करियरमध्ये त्याने अनेक चढ-उतार पाहिले. कधी हिणवला गेला, तर कधी त्याच्या बंगल्यासमोर लोकांनी त्याची झलक पाहण्यासाठी गर्दी केली. जेव्हा सेलिब्रेटींची चरित्रे किंवा आत्मचरित्रांचे फॅड नव्हते, तेव्हा त्याचे चरित्र ‘किंग ऑफ बॉलीवूड’ही लिहिले गेले. तो जेव्हा दिल्लीतून मुंबईत आला तेव्हा तो कोणीच नव्हता; पण तो आज बॉलीवूडचा बादशहा झाला आहे. आता या बादशहाच्या पंजाबी हॅरीची उत्सुकता आहे...

Web Title: entertainment shahrukh khan 25 years career