चेतन भगत संतापला, म्हणाला 'सुशांतच्या मृत्युचा तमाशा केला आहे'

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 10 October 2020

या प्रकरणात प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांची देखील प्रतिक्रिया आली आहे ज्यामध्ये त्यांनी रिपोर्टवर संशय घेणा-यांवर टिका केली आहे.

मुंबई-सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एम्स टीमने त्यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट सीबीआयवर सोपवला होता.  या रिपोर्टमध्ये सुशांतच्यी हत्या झाल्याचे पुरावे न मिळाल्याने सुशांतने आत्महत्याच केल्याच्या निष्कर्ष त्यांनी दिला आहे. मात्र हा रिपोर्ट सुशांतच्या कुटुंबियांनी आणि त्याच्या चाहत्यांनी स्विकारण्यास नकार दिला आहे. तसंच एम्सच्या रिपोर्टवर संशय घेतला आहे. या प्रकरणात प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांची देखील प्रतिक्रिया आली आहे ज्यामध्ये त्यांनी रिपोर्टवर संशय घेणा-यांवर टिका केली आहे.

हे ही वाचा: सुशांतचा मित्र सॅम्युअल होकिपला मिळाली धमकी, एफआयआर केली दाखल  

बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, चेतन भगतने नाराजी दर्शवत म्हटलं की लोकांनी सुशांतच्या मृत्युच्या तमाशा बनवुन ठेवला आहे. त्याने सांगितलं की 'तो कधी एम्सला गेला नाही मात्र ती एक संस्था आहे जिथे  प्रवेश आणि जॉब मिळणं कठीण आहे. चेतनने एम्सची तुलना आयआयटी दिल्लीसोबत करत म्हटलं की जर कोणी अशा संस्थेला भ्रष्ट म्हणतं तेव्हा खूप राग येतो.' त्यांनी एम्सच्या रिपोर्टवर संशय करणा-यांवर राग व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलंय की एम्स रिपोर्टवर संशय करणा-यांनी आधी या प्रकरणात पुरावे सादर करावेत.

सुशांतच्या मृत्यु प्रकरणात चेतन भगत आधी देखील अनेकदा बोलला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सुशांतचा डेब्यु सिनेमा काय पो छे चेतन भगतच्या '३ मिस्टटेक्स ऑफ माय लाईफ' या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित होता. सुशांतचे वकिल विकास सिंह यांनी एम्सचा रिपोर्ट पूर्णपणे फेटाळला आहे आणि त्यांनी हा रिपोर्ट चुकीचा असल्याचं म्हटलंय.   

entire discussion on sushant death has become a tamasha says chetan bhagat  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: entire discussion on sushant death has become a tamasha says chetan bhagat