गणेशोत्सवासाठी खास संगीत सम्राट च्या स्पर्धकांची आरास

टीम ई सकाळ
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

मराठी प्रेक्षकांच्या मनाचा अचुक ठाव घेत, सध्या झी युवा ही वाहिनी विविध मालिकांच्या आणि संगीतमय कार्यक्रमांच्या सहाय्याने,  मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांसाठी सादर करत आहे. गणांचा अधिपती, बुद्धीचा देव आणि सकल कलांचे दैवत असलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी झी युवा ही वाहिनी ‘संगीत सम्राट - स्वराभिषेक ' हा एक अतिशय सुंदर असा संगीतमय  कार्यक्रम आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. गणेशोत्सवासाठी खास, संगीत सम्राट च्या स्पर्धकांची आरास आणि झी युवाच्या मालिकांमधील आपल्या आवडत्या कलाकारांचे परफॉर्मन्स असेलला हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असणार आहे .

मराठी प्रेक्षकांच्या मनाचा अचुक ठाव घेत, सध्या झी युवा ही वाहिनी विविध मालिकांच्या आणि संगीतमय कार्यक्रमांच्या सहाय्याने,  मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांसाठी सादर करत आहे. गणांचा अधिपती, बुद्धीचा देव आणि सकल कलांचे दैवत असलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी झी युवा ही वाहिनी ‘संगीत सम्राट - स्वराभिषेक ' हा एक अतिशय सुंदर असा संगीतमय  कार्यक्रम आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. गणेशोत्सवासाठी खास, संगीत सम्राट च्या स्पर्धकांची आरास आणि झी युवाच्या मालिकांमधील आपल्या आवडत्या कलाकारांचे परफॉर्मन्स असेलला हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असणार आहे . तरुणाईचे स्पंदन अचूक टिपलेल्या झी युवा या वाहिनीवर हा कार्यक्रम येता रविवार २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७:०० वाजता दाखवण्यात येईल.

इंग्रजांच्या काळात भारतीय संस्कृती लयास जात होती, तसेच लोक एकत्र येत नव्हते. लोकमान्य टिळकांना वाटे कि स्वातंत्र्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवेच त्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केला. अनेक जागी वेगवेगवेळे सांस्कृतिक कार्यक्रम करून लोकांना मनोरंजनाच्या दृष्टीने एकत्र येण्याचे काम हे उत्सव करत होते. सध्या झी युवा या वाहिनीने लोकांचे पुरेपूर मनोरंजन करण्याचे ठरल्यामुळे निरनिराळे मनोरंजनाचे कार्यक्रम प्रेक्षकांसाठी तयार करत आहेत. तसं पाहता “नवे पर्व... युवा सर्व “म्हणत तरुणांच्या मनात राज्य करायला आलेली ‘झी युवा ' ही युथफूल वाहिनी  बघता बघता एक वर्षाची झाली. मराठी मनोरंजन विश्वात अगोदरपासून भक्कमपणे पाय रोवून असलेल्या अनेक वाहिन्यांपेक्षा, एक वेगळं हक्काचं स्थान निर्माण करण्यासाठी, झी युवा या वाहिनीने भरपूर मेहनत घेत गेल्या वर्षाभरात अनेक मैलाचे दगड पार केले आहेत. युवोत्सव, कल्ला ,सरगम, संगीत सम्राट या संगीतमय कार्यक्रमांना प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. याच प्रथेला पुढे नेत रविवारी गणेशोत्सव स्पेशल ' संगीत सम्राट - स्वराभिषेक ' हा कार्यक्रम प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत आहे. या कार्यक्रमात झी युवा या वाहिनीवरील विविध मालिकेतील आपले आवडते कलाकार आणि संगीत सम्राट चे गाजलेले आवडते स्पर्धक त्यांच्या धमाकेदार सादरीकरणाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करतील.

Web Title: esakal entertainment news marathi tv show news