ई सकाळ Exclusive : सिनेमा नेमका चित्रित होतो कसा? डिजिटल युगात होणार पहिल्यांदाच आॅनलोकेशन #Live

टीम ई सकाळ
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

ई सकाळने फेसबुक पेजवरून लाईव्ह शो सुरू केले आणि नेटकऱ्यांच्या मनोरंजनात भर पडली. या लाईव्ह शोमध्ये सातत्याने नवे प्रयोग होत असतात. त्याचाच एक भाग म्हणून ई सकाळच्या एफबी पेजवरून मंगळवारी दुपारी तीन वाजता सिनेमाचं शूट लाईव्ह दाखवलं जाणार आहे. यावेळी या सिनेमाचे कलाकार, दिग्दर्शकही आपल्याशी बोलणार आहेत. डिजिटल युगामध्ये शुटिंग लाईव्ह दाखवण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. 

पुणे: सिनेमा तयार झाला की तयारी सुरू होते प्रमोशनची. मग कलाकार गावोगावी जाऊन सिनेमा लोकांपर्यंत पोचावा म्हणून झटत असतात. आपला सिनेमा कसा चांगला आहे, तो शूट करताना काय काय अडचणी आल्या अशा सगळ्या गोष्टी ते सांगत असतात. पण शूट नेमकं कसं चालतं, लोकेशनवर काय काय गहजब असतो ते फार कमी लोकांना माहित असतं. पण ई सकाळने मात्र डिजिटल युगाची कास धरत एक नवी पायरी गाठायचं ठरवलं आहे. म्हणूनच मराठी चित्रपटाचं आॅन लोकेशन लाईव्ह करण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता हा लाईव्ह होणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे मुळशी पॅटर्न. 

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे करत असून, यात उपेंद्र लिमये, देवेंद्र गायकवाड, रमेश परदेशी आदी मंडळी असणार आहेत. हा सिनेमा एक थरारपट असल्याचं समजतं. पुण्यात गेले अनेक दिवस या चित्रपटाचं शूट सुरू असून ई सकाळ मार्फत पहिल्यांदाच हा प्रकार लाईव्ह शूट होणार आहे. ई सकाळच्या एफबी पेजवरून हे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल. कॅमेरा असा असतो इथपासून व्हॅनिटी व्हॅन कशी असते अशा अनेक गोष्टी यात पाहायला मिळणार आहेत. 

तेव्हा डिजिटल विश्वातील हा पहिला वहिला अनुभव घ्यायला विसरू नका. मंगळवारी दुपारी 3 वाजता. ई सकाळच्या एफबी पेजवरून. 

Web Title: esakal exclusive on location FB live