'पद्मवाती'ला विरोध ही भारतीयांची अधोगती- दीपिका पदुकोन

बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

'पद्मावती' सिनेमा येत्या 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. मात्र, या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच मोठा वाद निर्माण झाला आहे. या सिनेमात राणी पद्मिनी आणि सम्राट अलाउद्दीन खिलजी यांच्यातील संबंध दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे विविध राजपूत संघटनांनी याला विरोध करत निषेध केला. हा विरोध काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने दीपिकाने यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच तिने काल (मंगळवार) सिनेमाचे प्रदर्शन होणारच असे ठामपणे सांगितले होते. 

मुंबई : दिग्दर्शक संजय लिला भंसाळी यांच्या 'पद्मावती' सिनेमाच्या प्रदर्शनावरुन वाद निर्माण झाला आहे. मात्र, या सिनेमातील राणी पद्मिनीचा रोल साकारलेली अभिनेत्री दीपिका पदुकोनने यावर नाराजी व्यक्त करत 'पद्मवाती'ला विरोध ही भारतीयांची अधोगती असल्याचे विधान तिने केले आहे.

'पद्मावती' सिनेमा येत्या 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. मात्र, या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच मोठा वाद निर्माण झाला आहे. या सिनेमात राणी पद्मिनी आणि सम्राट अलाउद्दीन खिलजी यांच्यातील संबंध दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे विविध राजपूत संघटनांनी याला विरोध करत निषेध केला. हा विरोध काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने दीपिकाने यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच तिने काल (मंगळवार) सिनेमाचे प्रदर्शन होणारच असे ठामपणे सांगितले होते. 

त्यानंतर आज तिने पुन्हा एकदा याबाबत वक्तव्य केले आहे. ती म्हणाली, "आज आपण राष्ट्र म्हणून कोठे आहोत? तसेच आम्ही फक्त सेन्सॉर बोर्डाला उत्तर देण्यास बांधील आहोत. या सिनेमाचे प्रदर्शन कोणीही थांबवू शकत नाही यावर मला विश्वास आहे". 

Web Title: esakal marathi news padmavati dipika padukon news