राज माझा प्रत्येक चित्रपट पाहील याची खात्री आहे- नाना पाटेकर

मंगळवार, 23 जानेवारी 2018

पुणे- फेरीवाल्यांच्या प्रश्नी राज यांच्या टिकेने दुखावलेल्या नाना पाटेकर यांनी मनसेने त्यांचं एक मत गमावलं असं वक्तव्य काही दिवसांपुर्वी केलं होत. यावरुन नाना पाटेकर यांना त्यांच्या 'आपला मानूस' या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तुम्ही तुमचा एक प्रेक्षक गमावला का? असे विचारल्यावर "राज माझा चित्रपट पाहणार नाही, असं होणार नाही, राज काल माझा प्रेक्षक होता, आज आहे आणि यापुढेही असेल, तो माझा प्रत्येक चित्रपट पाहील याची खात्री आहे" असे उत्तर त्यांनी दिले.

फेरीवाल्यांच्या प्रश्नावर मनसेचे आंदोलन सुरु असताना अभिनेता नाना पाटेकर यांनी घेतलेल्या भुमिकेवर राज यांनी टिका केली होती. त्यावेळी नाना पाटेकर यांनी देखील मनसेनं त्यांचं एक मत गमावलं असं वक्तव्य केलं होत. थोडाफार वाद होत असतो पण म्हणुन आपण माणसं सोडत नाही, असेही नाना म्हणाले.

Web Title: esakal marathi news raj thackeray nana patekar aapla manus