रिव्ह्यू #Live: 'कंडिशन्स अप्लाय' नात्यात येणाऱ्या अटींना केलेला प्रामाणिक स्पर्श

समीक्षा: सौमित्र पोटे. कॅमेरा : योगेश बनकर
गुरुवार, 6 जुलै 2017

या शुक्रवारी रिलीज होणाऱ्या 'कंडिशन्स अप्लाय' या सिनेमाचा ताजा रिव्ह्यू सर्वात आधी दिला तो ई सकाळने. हा रिव्ह्यू लाईव्ह करतानाच, सिनेमातल्या कलाकारांनाही या रिव्ह्यूवर बोलतं केलं जातं. या रिव्ह्यूमध्ये भाग घेतला दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी. एकूण सिनेमाचा विषय आणि प्रामाणिक प्रयत्न पाहता या सिनेमाला मिळाले आहेत 3 चीअर्स

आजची पिढी कमालीची प्रॅक्टिकल आहे. याचा अर्थ जुनी पिढी नव्हती असं नाही. पण मनातले प्रश्न मांडायचं धाडस या नव्या पिढीकडे आहे आणि सांगितलेली गोष्ट एेकण्याचा पेशन्स जुन्या पिढीकडे अनुभवातून आला आहे. या दोन बाजू पकडून दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी हा नवा सिनेमा बनवलाय. 'कंडिशन्स अप्लाय'

'कंडिशन्स अप्लाय' या येत्या शुक्रवारी प्रदर्शीत होणार्या ' मराठी सिनेमाचा रिव्ह्यु 

नातं कोणतंही असो, ते एकदा फुलायला लागलं की त्यात अदृश्य अटींचा समावेश होतो. या अटी जाचक वाटू लागल्या की नात्यातला ओलावा जातो. वंगण संपल्यागत होतं असं म्हणू. आणि मग भांड्याला भांडं लागतं आणि आवाज वाढू लागतो. याा वाढलेल्या अटी आणि त्यातून नात्यात येणारे चढउतार या सिनेमात दिसतात. या सिनेमाचा रिव्ह्यू ई सकाळने सर्वात आधी केला. अर्थातच ही समीक्षा लाईव्ह होती. सिनेमा पाहून आल्या आल्या लगेच हा लाईव्ह रिव्ह्यू करण्यात आला. त्याचे दोन भाग करण्यात आले. पहिल्या भागात फक्त रिव्ह्यू आणि दुसऱ्या भागात साक्षात दिग्दर्शक गिरीश मोहिते यांच्यासमवेत त्या रिव्ह्यूवर चर्चा. 

'कंडिशन्स अप्लाय' सिनेमाच्या रिव्ह्युवर दिग्दर्शकांशी चर्चा

या सिनेमाची एकूण मांडणी उत्तम आहे. गाणी चांगली आहेत. एक चांगला अल्बम 'कानसेनांना' या निमित्ताने एेकायला मिळेल. विषय रंजक आहे. आज लिव्ह इनमध्ये अनेक जोडपी राहाताना दिसतात. अनेकांच्या मनात लग्ना एेवजी लिव्ह इन मध्ये राहावं असा विचारही येत असेल. त्यासर्वांनी हा सिनेमा बघायला हरकत नाही. सिनेमाचा पूर्वार्घ चांगला वेग पकडतो. मात्र उत्तरार्धात मात्र तो शब्दबंबाळ होतो. शिवाय यातल्या दृश्यांमध्येही काही गोष्टी हव्या होत्या. लाईव्ह रिव्ह्यूमध्ये त्या सगळ्याचा उल्लेख आहे. 

हा एकूण विषय आणि त्याचा शेवट पाहता एक प्रामाणिक प्रयत्न यात दिसतो. या प्रयत्नाला, विचाराला ई सकाळने दिले आहेत 3 चीअर्स

एक नक्की, कोणतंही नातं जुळायला आणि ते जुळलेलं नातं तुटायला खमकं कारण लागतं. दोन आपआपली मतं असलेली, विचारपूर्वक एकत्र आलेली जोडी क्षुल्लक कारण दाखवून तोडणं हे पचायला थोडं अवघड आहे. ती शृंखला जर योग्य आखली असती तर मात्र या कंडीशन्स जरा जास्त अॅप्लिकेबल झाल्या असत्या.  

Web Title: esakal news entertainment news live review marathi movie conditions apply